शेती पडीक असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:19 AM2019-01-10T01:19:47+5:302019-01-10T01:20:18+5:30
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुुलनेत फार कमी पाऊस झाला. तर ऐन रोवणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातीेल अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलीे नव्हती. परिणामी जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर शेती पडीक राहिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुुलनेत फार कमी पाऊस झाला. तर ऐन रोवणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातीेल अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलीे नव्हती. परिणामी जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर शेती पडीक राहिली. धानाचे पऱ्हे आणि मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुध्दा निघाला नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली. मात्र या शेतकºयांना अद्यापही शासनाने कुठली नुकसान भरपाई दिली त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
२०१७ चे खरीप हंगामात संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने नर्सरी टाकून मशागत केलेली सुमारे ५५ हजार हेक्टर शेतीत रोवणीच झाली नाही. यात आमगाव तालुक्यातील चारही महसूल मंडळात २१३७ हेक्टर, सालेकसा तालुक्यातील ३ महसूल मंडळात १ हजार ८६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यातील ३ महसूल मंडळात १० हजार ८३० हेक्टर, गोंदिया तालुक्यातील ७ महसूल मंडळात १४ हजार ६९२ हेक्टर, देवरी तालुक्यातील ३ महसूल मंडळातील ९ हजार १७२ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यातील ३ महसूल मंडळात २ हजार ८१४ हेक्टर, तिरोडा तालुक्यातील ४ महसूल मंडळातील १२ हजार ३०२ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ महसूल मंडळातील बोंडगावदेवी २४१ हेक्टर अशी सुमारे ५५ हजार हेक्टर शेत जमीन पडीक राहीली.
सुरूवातीला बºयापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी धानाचे पºहे टाकले होते. तसेच हवामान विभागाने सुध्दा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. महागडे बियाणेही वापरुन शेतीची मशागत केली होती. मात्र पावसाअभावी रोवणीच न झाल्याने बियाणाचा खर्च, मशागतीच्या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. मागील दोन तीन वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड देणाºया शेतकऱ्यांना मागीलवर्षी पावसाअभावी शेती पडीक ठेवावी लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले.
याचा अहवाल सुध्दा कृषी विभागाने शासनाला पाठविला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही शेतकºयांना कुठलीच आर्थिक मदत देण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून हीच का सरकारची शेतकºयांप्रती संवेदनशिलता असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पीक विम्याच्या लाभापासून वंचित
पावसाअभावी रोवणी न करणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक काढला होता. मात्र त्याचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला नाही.केवळ तिरोडा तालुक्यातील वडेगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. तर उर्वरित ३० महसूल मंडळातील एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्याचा भुर्दंड शेतकºयांना बसला.