शासकीय वसतिगृहाचा वीज पुरवठा अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 09:58 PM2017-09-18T21:58:33+5:302017-09-18T21:59:01+5:30
मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा मागील १६ दिवसांपासून खंडित होता.
अंकुश गुंडावार । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा मागील १६ दिवसांपासून खंडित होता. लोकमतने यासंबंधीचे वृत्त रविवारच्या अंकात प्रकाशीेत करताच एकच खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.१७) वसतिगृहाचा विद्युत पुरवठा पूर्वत सुरू करुन दिला. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हास्य फुलले.
गोंदिया शहराला लागून असलेल्या मुर्री येथे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. आदिवासी दुर्गम भागातील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. या वसतिगृहात इयत्ता सहावी ते दहावी चे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. घरापासून दूर राहून चांगले शिक्षण घेवून काहीतरी बनण्याच्या अपेक्षेने हे विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. शार्ट सर्किटमुळे या वसतिगृहाच्या दुसºया आणि तिसºया माळ्यावरील विद्युत पुरवठा २ सप्टेंबरपासून खंडित झाला होता. तेव्हापासून विद्यार्थ्यांना अंधारात राहावे लागत होते. लोकमतने या वसतिगृहाला भेट देऊन तेथील समस्यांना वाचा फोडल्यानंतर समाज कल्याण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. या शासकीय वसतिगृहाच्या देखलभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात वसतिगृहाच्या गृहपालाने संबंधीत शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांना तीनदा पत्र दिले. मात्र यानंतरही त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून अंधारात आणि गरमीमध्ये झोपावे लागत होते.
लोकमतने या समस्येचे सविस्तर वृत्त रविवार(दि.१६)च्या अंकात प्रकाशीत केले. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वसतिगृहाकडे धाव घेत समस्येचा आढावा घेतला. वसतिगृहाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियत्यांनी सोमवारी वसतिगृहात पोहचत विद्युत पुरवठा सुरळीत करुन दिला. यामुळे गेल्या १६ दिवसांपासून अंधारात असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
विद्यार्थ्यांनी मानले लोकमतचे आभार
वसतिगृहातील खंडित विद्युत पुरवठा आणि तेथील समस्यांचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर समाज कल्याण विभागाने त्याची तातडीने दखल घेत त्या मार्गी लावल्या. गेला १६ दिवसांपासून खंडित असलेला विद्युत पुरवठा देखील सुरळीत झाला. लोकमतमुळे आमची समस्या मार्गी लागल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले.
सध्या वीजेची तात्पुरती सोय
शार्ट सर्कीटमुळे वसतिगृहाच्या दुसºया आणि तिसºया माळ्यावरील वायरींग पूर्णपणे जळाली आहे. वायरींग बदलण्यास दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत तात्पुरती सोय म्हणून थेट वीज पुरवठा घेण्यात आला आहे. लवकरच वायरींग बदलण्यात येणार असल्याचे वसतिगृहाच्या अधिकाºयांनी सांगितले.
अधिकारी वसतिगृहात
वसतिगृहाच्या खंडित वीज पुरवठ्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशीत होताच समाज कल्याण अधिकारी पवार, समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी (दि.१७) वसतिगृहाला भेट देऊन समस्येचा आढावा घेतला. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी देखील याची माहिती घेतल्याचे वसतिगृहाच्या अधिकाºयांनी सांगितले.