शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:28 PM2019-03-04T21:28:34+5:302019-03-04T21:28:49+5:30

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापही विविध सोयी सुुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध समस्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे.

Government Medical College accepts problems | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला समस्यांचे ग्रहण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला समस्यांचे ग्रहण

googlenewsNext
ठळक मुद्देचार वर्षांपासून दिव्यांग युनिक कार्डपासून वंचित : माहिती फलक गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होवून तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापही विविध सोयी सुुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध समस्यांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना डिजीटल योजनेतंर्गत युनिक कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेगळा विभाग स्थापन करुन या कार्डचे वितरण करण्याचे निर्देश दिले होते. युनिक कार्डसाठी ५९३ दिव्यांगांनी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी केवळ ३३ दिव्यांगांना युनिक कार्ड वितरीत करण्यात आले. ५६० अर्ज अजूनही वैद्यकीय महाविद्यालयात धूळ खात पडले आहे. गोंदिया जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व अपंग बोर्ड पूर्वी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापना करण्यात आला होता. २०१७ मध्ये हे केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून या केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे. युनिक कार्ड प्रणालीत २१ प्रकारच्या व्यंगाचा समावेश आहे. मात्र या कार्डचे वितरणच दिव्यांगांना करण्यात आले नाही त्यामुळे या सुविधापासून वंचित आहेत.
याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वांरवार पाठपुरावा करण्यात आला मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
जनआरोग्य योजनेचे फलक गायब
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाह्य रुग्ण विभागासमोर राजीव गांधी जीवनदायी योजनेचा फलक लावण्यात आला होता. त्यानंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेतंर्गत कुठल्या आजारावर मोफत उपचाराची सोय आहे, कुठल्या आरोग्य योजनाचा विमा आहे. याची माहिती दर्शविणारे फलक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून गायब झाले आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे.
पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे दुुर्लक्ष
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सोयी सुविधांबाबत अपंग सेलचे अध्यक्ष संकेश तिवारी यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे वांरवार पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नाही.

Web Title: Government Medical College accepts problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.