शासकीय मेडिकल क ॉलेजमध्ये विश्वस्तरीय उपचार मिळणार

By admin | Published: April 1, 2017 02:38 AM2017-04-01T02:38:02+5:302017-04-01T02:38:02+5:30

न्यायालयात याचिका टाकल्यानंतर आम्ही गोदियात मेडीकल कॉलेज आणले.

Government Medical Colleges will get world-class treatment | शासकीय मेडिकल क ॉलेजमध्ये विश्वस्तरीय उपचार मिळणार

शासकीय मेडिकल क ॉलेजमध्ये विश्वस्तरीय उपचार मिळणार

Next

गोपालदास अग्रवाल : रजेगाव येथे पार पडले आरोग्य शिबिर
गोंदिया : न्यायालयात याचिका टाकल्यानंतर आम्ही गोदियात मेडीकल कॉलेज आणले. यामुळे क्षेत्रातील तरूणांना रोजगारोन्मुख शिक्षण नि:शुल्क प्राप्त होणार. तर येत्या तीन-चार वर्षांत मेडीकल कॉलेजमध्ये दवाखान्याची स्थापना पूर्ण होणार व येथेच विश्वस्तरीय उपचाराची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार असून कोणत्याही आजारासाठी बाहेरगावी जावे लागणार नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्ट, लायंस क्लब गोंदिया ग्रीनसिटी व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्यावतीने आयोजीत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या भरसक कार्यामुळे केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलला असून अत्याधुनिक मशिन उपलब्ध झाल्या असल्याचे सांगीतले.आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी, रजेगाव व खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य क्रांती आल्याचे मत व्यक्त के ले.
याप्रसंगी मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ.राजेंद्र जैन, डॉ.अनिल परियाल, डॉ.पौैनीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी निमगडे, डॉ.आशा अग्रवाल, डॉ.चौरागडे, डॉ.पातूरकर, डॉ.छोडे, डॉ.नेवारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.पक्षनेता रमेश अंबुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नागपूरे, माजी सभापती स्नेहा गौतम, प्रकाश रहमतकर, सरिता अंबुले, लक्ष्मी रहांगडाले, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनिष मेश्राम, खंड विकास अधिकारी इस्कापे, पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Government Medical Colleges will get world-class treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.