शासनाच्या योजना समाज परिवर्तन घडविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:25 PM2018-10-29T21:25:28+5:302018-10-29T21:25:46+5:30

चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘बाटा सारख्या उद्योगांनी अंगिकारुन व्यवसाय केला. चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे, यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे.

Government plans to transform society | शासनाच्या योजना समाज परिवर्तन घडविण्यासाठी

शासनाच्या योजना समाज परिवर्तन घडविण्यासाठी

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : रोजगार व माहिती मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘बाटा सारख्या उद्योगांनी अंगिकारुन व्यवसाय केला. चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे, यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ व राज्यातील संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना सुरु आहेत. या योजनांच्या माध्यमातून अनेकांनी आपले व्यवसाय, उद्योग, उच्च शिक्षण करुन यश मिळविले आहे.
आज चर्मकार समाजातील मुले आयएएस, आयपीएस होत आहेत. विदेशात जात आहेत. मोठे उद्योजक घडत आहेत. हे सकारात्मक बदल समाजात घडत आहे.ग्रामीण भागातील युवकांमधील नैराश्य दूर करण्यासाठी व समाजात परिवर्तन घडविण्यासाठी अशा मेळाव्याच्या माध्यमातून योजनांची माहिती व त्याचे लाभ पोहोचिवणा हाच मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक अर्जुनी येथील तेजिस्वनी लॉनमध्ये संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने आयोजित रोजगार व माहिती मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश ढाबरे, जि.प. समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स. सभापती गिरधर हत्तीमारे, अर्जुनी मोरगाव पं.स सभापती अरविंद शिवणकर, युवा उद्योजिका पद्मजा राजगुरु, विभागीय व्यवस्थापक आलोक मिश्रा, पंस उपसभापती राजेश कठाणे, शारदा बडोले, अमर तांडेकर, जितेंद्रसिंग जगने, जि.प.सदस्य शिला चव्हाण, तेजुकला गहाणे, रामू जगनीत, चव्हाण गुरुजी, बरय्या, रतन वासनिक, मनोहर चौरे, गंगाधर सोनवने उपस्थित होते.
बडोले म्हणाले, जशा उद्योगपतींच्या वस्तू सर्वत्र विकल्या जातात तशाच लीडकॉमच्या वस्तू विकण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दुकाने सुरु करण्याचा कार्य आम्ही करीत आहोत. गटईच्या निविदा काढल्या जात आहेत. युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उभा करण्यासाठी मागील चार वर्षात मोठे कार्य झाले आहे.
जिल्ह्यातही मोठे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ५० एकर जागेचा शोध सुरु आहे. केंद्र व राज्य सरकारचे चर्मकार समाजासाठी असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना,प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज आदी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
ढाबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात, महामंडळाच्या योजना राबविताना त्या तळागळापर्यंत पोहोचिवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील प्रशिक्षण प्राप्त युवकांनी मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार उभारुन आदर्श उभे केले आहे. यात नुकत्याच सडक अर्जुनी तालुक्यात १३ युवकांनी प्रशिक्षणानंतर उभारलेले स्वयंरोजगार हे उदाहरण आहे.
यावेळी मुंबईच्या युवा महिला उद्योजिका पद्मजा राजगुरु यांनी आपली नोकरी ते यशस्वी उद्योजिका होण्याचा प्रवास कथन केला.आलोक मिश्रा यांनी, रोजगार व स्वयंरोजगार निवडीसंदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्ह्यातील चर्मकार समाजातील यशस्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच १३ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजाराचे कर्ज वितरीत करण्यात आले. यशस्वीतेसाठी विजय बिसेन, डॉ. लक्ष्मण भगत, रघुनाथ लांजेवार, कविता रंगारी, लक्ष्मीकांत धानगाये यांच्यासह लीडकॉमचे वरिष्ठ अधिकारी तुषार कुळकर्णी, दिलीप दुतडे, वैभव खटावकर, पुणेवार, काथवटे, ढगे, पांडे, भगत उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन अनिल मेश्राम यांनी केले तर आभार लीडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक पी.पी.महाजन यांनी मानले.

Web Title: Government plans to transform society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.