शेतकऱ्यांचे नव्हे, श्रीमंतांचे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:20 PM2018-02-18T21:20:59+5:302018-02-18T21:21:18+5:30
शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाºयांची काळजी अधिक आहे. हे शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमतांचे सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी दिंडीला तिरखुरी येथून बिरसा मुंडाच्या मंदिरातूून सुरूवात करण्यात आली. या वेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, योगेश नाकाडे, गोर्वधन ताराम, अमन पालीवाल, अनिल गावळे, प्रिया जांभुळकर सरपंच, विजय कुंभरे, हिरासिंग मडावी, मधुकर नरेटी, रमेश सलामे, चंद्रशहा मडावी, रमेश कोल्हे, बालू ताराम, किशोर राऊत, श्यामराव धुर्वे, देविदास कोरेटी, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य सहभागी झाले होते.
चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज असताना सरकारने नाममात्र कर्जमाफीची घोषणा केली. ही शेतकºयांची दिशाभूल आहे. सरकाराने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव द्यावा. धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची मागणी त्यांनी केली.
यानंतर सदर दिंडी किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. दिंडी तिरखुरी, भरनोली, बनीटोला, बोरटोला, शिवरामटोला,कन्हाळगाव, राजोली, खडकी, खडकीटोला, सायगाव, तुकुम, नविन टोला, जांभळी येथे पोहोचली आहे.