गौ-पालक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक बळ द्यावे
By admin | Published: November 22, 2015 02:01 AM2015-11-22T02:01:04+5:302015-11-22T02:01:04+5:30
गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे.
संतश्री गोपालमणी महाराज : शेणखत खरेदीचा निर्णय घ्यावा
आमगाव : गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे. शेतकरी गायपालनाला शासनाने आर्थिक बळ द्यावे. त्याच्या शेणखताला राष्ट्रीय मान्यता देऊन खरेदीचा निर्णय घ्यावा. यात शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल असा संदेश संतश्री गोपालमणी महाराज यांनी दिला.
आमगाव येथे पाच दिवसीय गौकथा व प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात संतश्री गोपालमणीजी महाराज आपल्या वाणीने गौपालकांना बळ देत. गौ वाच्विण्यासाठी प्रेरणा व संकल्प घेत आहेत. शेणखतामुळे शेतीत पोषक तत्व मिळतात. शेत उत्पादन वाढत आहे.
गौमाता ही भारतीय संस्कृतीची धरोहर असून तीच्या प्रत्येक घटकापासून मिळणारे पदार्थ शास्त्रीय दृष्टीने लाभदायक असल्याचे सांगत त्यांनी दूध, दही, तूप, शेण, लघवी यात आरोग्य दायकतत्व आहेत. या पोषक तत्त्वांच्या उत्पादन वाढीला शासनाने राष्ट्रीय पातळीवर मान्यता द्यावी तर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देत गौपालक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेणखतांना खरेदी केंद्र स्थापन करून योग्य भावासह आर्थिक बळ देण्यात यावे, यामुळे गाईचे महत्व सर्वांना प्रसारीत होईल. शासनाकडे गौ घटकातून निर्माण होणाऱ्या पदार्थाची क्रय-विक्रयेचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)