महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:16+5:30
प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्टतर्फे तालुक्यातील खातीया येथे बुधवारी वैयक्तीगत लाभ योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले,पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प.सदस्य विजय लोणारे,टिकाराम भाजीपाले,दिनेश अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात सत्तेवर आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकांपूर्वी दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर केवळ २ लाख रुपयांपर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. तसेच धानाला प्रती क्विंटल २५०० हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची देखील पुर्तता केली नसून अद्यापही बोनसचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही.त्यामुळे राज्यातील विद्यमान सरकारने त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी खातीया येथे आयोजित कार्यक्रमात केली.
प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्टतर्फे तालुक्यातील खातीया येथे बुधवारी वैयक्तीगत लाभ योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले,पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प.सदस्य विजय लोणारे,टिकाराम भाजीपाले,दिनेश अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गोपालदास अग्रवाल म्हणाले, विमा कंपनीच्या नियमानुसार ७ ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास पीक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ देणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात सरकार अपयशी ठरल्याची टिका अग्रवाल यांनी केली. तर ट्रस्टच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन आपण जनतेच्या पाठीशी सदैव राहू अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. शिबिरात श्रावनबाळ योजनेचे २३, किमान सन्मान निधीचे ३०,आयुष्मान भारत योजनेचे १६७, कामगार कल्याण योजनेची ३९ प्रकरणे मार्गी लावण्यात आली.