शासनाने आरोग्य सेवेवर विशेष लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 02:09 AM2017-06-08T02:09:45+5:302017-06-08T02:09:45+5:30

नागरिकांना उपचार उपलब्ध करवून देणे हे प्रगतीशील शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र येथील सिटी स्कॅन मशीन ...

Government should pay special attention to health service | शासनाने आरोग्य सेवेवर विशेष लक्ष द्यावे

शासनाने आरोग्य सेवेवर विशेष लक्ष द्यावे

Next

गोपालदास अग्रवाल : खमारी येथील नि:शुल्क आरोग्य शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरिकांना उपचार उपलब्ध करवून देणे हे प्रगतीशील शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र येथील सिटी स्कॅन मशीन नऊ महिन्यांपासून बंद पडून आहे. ३५ नवजात बाळांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर हे गंभीर प्रश्न उभे करतात. विधानसभेच्या पावसाळी सत्रात या गंभीर विषयांना मांडणार. राज्य शासनाने आरोग्य सेवेवर विशेष लक्ष द्यावे अशी प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जवळील ग्राम खमारी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्ट व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत आयोजीत नि:शुल्क रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या भक्कम प्रयत्नांमुळे केटीएस व बीजीडब्ल्यु रूग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलून गेल्याचे सांगीतले. तर सभापती पी.जी.कटरे यांनी, ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांची स्थापना करून आरोग्य क्रांती आल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. अजय केवलिया, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अनिल परियाल, डॉ.पौनीकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पातूरकर, डॉ.छोडे, डॉ. नेवारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.पक्षनेता रमेश अंबुले, माजी सभापती स्नेहा गौतम, मनिष मेश्राम, खंडविकास अधिकारी इस्कापे, जि.प.सदस्य विजय लोणारे, शेखर पटेल, विठोबा लिल्हारे, सिमा मडावी, अनिल मते, विनीता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, माधुरी हरिणखेडे, प्रकाश डहाट, चमन बिसेन, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, सारंग भेलावे, हरिचंद कावळे व अन्य उपस्थित होते.

Web Title: Government should pay special attention to health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.