शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:38+5:302021-02-25T04:36:38+5:30
गोंदिया : शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. शासन स्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून आपली जि. प. शाळा ...
गोंदिया : शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. शासन स्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून आपली जि. प. शाळा इतर शाळांच्या तुलनेत कशी पुढे नेता येईल, यासाठी आता मनरेगाच्या माध्यमातून शाळेचा विकास करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शाळेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावर लागणाऱ्या सुविधांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचे जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी सांगितले.
तालुक्यातील जि. प. व उच्च प्राथमिक शाळा कारंजा येथे ग्राम स्वच्छता अंतर्गत दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत फुलचूर जि. प. क्षेत्रात कारंजा शाळेची निवड झाली आहे. त्याची तपासणी जिल्हास्तर चमूने भेट देऊन केली. या वेळी गोंदियाचे खंडविकास अधिकारी निर्वाण, विस्तार अधिकारी डी. आर. लंजे, केंद्र प्रमुख केदार गोटेफोडे, पी. सी. मेश्राम, पंचायत विभागातील संसाधन केंद्रातून भागचंद रहांगडाले, साधना डोंगरे, तृप्ती साकुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्राम स्तरावरील सरपंच धनवंता उपराडे, उपसरपंच महेंद्र शहारे, वनमाला बडोले, सदस्य लिखीराम बनोठे, गजानन नागपुरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवानंद गराडे, दिनेश रहमतकर, ममता पद्माकर, मुख्याध्यापक एस. यू. खोब्रागडे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
शाळेच्या भेटीदरम्यान मुख्याध्यापक एस.यू. खोब्रागडे व अध्यक्ष रेवानंद गराडे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याध्यापकांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली. शालेय परिसर, जीर्ण झालेली इमारत, शोषखड्डा, शौचालय, विज्ञान केंद्र, डिजिटल रूम यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेता त्वरित दोन वर्गखोल्या बांधकाम करण्यासंबंधी अध्यक्षांनी विनंती केली. मान्यवरांनी समस्या जाणून घेतल्या व तसा ठराव पाठविण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एम. टी. जैतवार यांनी केले तर आभार के. जे. बिसेन यांनी मानले. यशस्वितेसाठी एम. एम. चौरे, हेमंत रूद्रकार, नरेश बडवाईक, डी. आर. खोब्रागडे, मंदा कोसरकर, वर्षा कोसरकर, संगीता निनावे व पूजा चौरसिया यांनी सहकार्य केले.