ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:23 PM2018-06-09T22:23:37+5:302018-06-09T22:23:37+5:30

G.P. To plant six lakh saplings | ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड

ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड

Next
ठळक मुद्दे२.६४ लाख खड्डे आॅनलाईन : एक लाख ८८ हजार खड्डे लवकरच खोदणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ५० लाखापेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. १ जुलैला वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत केवळ चार लाख १२ हजार ५९२ खड्डे खोदले आहेत. तर १ लाख ८८ हजार खड्डे खोदणे शिल्लक आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४६ ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींना एक लाख ४ हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ७१ हजार ४९२ खड्डे खोदले आहेत. गोंदिया तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींना एक लाख १९ हजार ९०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ४९ हजार २०० खड्डे खोदले आहेत.
गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उदिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ३४ हजार ७०० खोदले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींना ६९ हजार ३०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ३१ हजार ३०० खड्डे खोदले आहेत. आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींना ६२ हजार ७०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ५१ हजार ५०० खड्डे खोदले आहेत. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ५१ हजार ४०० खड्डे खोदले आहेत.
सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींना ४६ हजार २०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केवळ ४६ हजार खड्डे खोदले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींना ७७ हजार रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.
त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ७७ हजार खड्डे खोदले आहेत. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ४ जूनपर्यंत ४ लाख १२ हजार ५९२ खड्डे खोदले आहेत. १ लाख ८८ हजार ८ खड्डे अद्याप खोदणे शिल्लक आहे.
चार लाखांवर खोदले खड्डे
१३ कोटी वृक्ष लागवड योजनेत सहभागी झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींनी ४ लाखावर खड्डे खोदले. त्यापैकी २ लाख ६४ हजार ५५ खड्ड्यांची संख्या आॅनलाईन करण्यात आली. यात तिरोडा ७१ हजार ४९२ खड्डे, गोंदिया ३० हजार ३३३, गोरेगाव १३ हजार ५००, सडक-अर्जुनी ३० हजार ५००, आमगाव ९ हजार ४३०, देवरी ३० हजार ८००, सालेकसा ४६ हजार तर अर्जुनी-मोरगाव ३२ हजार खड्डे आॅनलाईन करण्यात आले.

Web Title: G.P. To plant six lakh saplings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.