घाटबोरी-तेली येथील अनाज भंडारवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:02+5:30

दुकानात चनाडाळ पंधरा पॉकीट (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असे लिहिलेले) तांदळाचे ४० कट्टे असून काही धान्य खाजगी तर काही धान्य शिधापत्रिकाधारकाकडून खरेदी केलेले आहे. या गव्हाचे तीन कट्टे असून चनाडाळ ४५ रुपये प्रती किलो, तांदूळ १८ रुपये प्रती किलो, तर गहू १५ रु पये प्रती किलोप्रमाणे विकत घेतल्याचे सदर दुकानदाराने महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात सांगितले आहे.

Grain shop at Ghatbori-Teli | घाटबोरी-तेली येथील अनाज भंडारवर धाड

घाटबोरी-तेली येथील अनाज भंडारवर धाड

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई : मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथील दोन व्यावसायीकांनी मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा साठा करुन ठेवला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या पथकाने शनिवारी (दि.१८) धाड टाकून दोन दुकानादारांकडून साठवून ठेवलेला अन्नधान्याचा साठा जप्त केला.
प्राप्त माहितीनुसात देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना घाटबोरी तेली येथे अवैधरित्या स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ, गहू, चना, तुरडाळ, चनाडाळ आदीचा साठा दोन दुकानदारांनी करुन ठेवला असल्याची माहिती मिळाली. याच आधारावर पोलिसांनी घाटबोरी तेली येथील हिरालाल झिंगरे यांच्या मालकीच्या हिमांशू अनाज भंडार येथे धाड टाकली. तेव्हा त्यांच्याकडे रास्त भाव दुकानातून पुरवठा करण्यात आलेला अन्नधान्य मोठ्या प्रमाणात प्रमाणात आढळला. हे स्वस्त धान्य शिधापत्रिकाधारकाकडून खरेदी केल्याची माहिती आहे.
या दुकानात चनाडाळ पंधरा पॉकीट (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असे लिहिलेले) तांदळाचे ४० कट्टे असून काही धान्य खाजगी तर काही धान्य शिधापत्रिकाधारकाकडून खरेदी केलेले आहे. या गव्हाचे तीन कट्टे असून चनाडाळ ४५ रुपये प्रती किलो, तांदूळ १८ रुपये प्रती किलो, तर गहू १५ रु पये प्रती किलोप्रमाणे विकत घेतल्याचे सदर दुकानदाराने महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात सांगितले आहे. तर दुसरी कारवाई चोपराम पतिराम आगाशे यांच्यावर करण्यात आली. त्यांच्या घरी गहू चार कट्टे, तांदूळ २५ कट्टे, चनाडाळ एक कट्टा, धनिया एका आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तहसीलदार उषा चौधरी यांच्या मार्गदर्शनात सौंदडचे मंडळ अधिकारी कृपानंद बी.गजभिये व परसोडीचे तलाठी किशोर सांगोडे यांनी मौका पंचनामा करून सविस्तर माहिती पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठविले आहे.

कारवाईकडे लागले लक्ष
देशात लॉकडाऊन सुरू असून कोणताही नागरिक उपाशी राहू नये म्हणून शासनातर्फे अन्नधान्याचे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वाटप केले जात आहे. काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे बरोबर वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली आहे. तर स्वस्त धान्य दुकानातील धान्य बाजारपेठेत विक्री केली जात असल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी घाटबोरी तेली येथे केलेल्या कारवाईनंतर आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर कुठली कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे आम्ही घाटबोरी तेली येथे दोन ठिकाणी धाड टाकली. अवैधरित्या साठवून ठेवलेले अन्नधान्य हे स्वस्त धान्य दुकानातील असून ते जप्त करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामा करून पुरवठा विभागाच्या आधिकाºयाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येईल.
- प्रशांत ढोले,
उपविभागीय पोलीस अधिकारी.
.............................
घाटबोरी तेली येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपास करून शासनामार्फत शिधापत्रिकाधारकांना मिळणारे स्वस्त धान्य विकणारे आणि घेणाºयावर संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-उषा चौधरी,
तहसीलदार सडक अर्जुनी.
 

Web Title: Grain shop at Ghatbori-Teli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.