ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:00 AM2020-12-12T05:00:00+5:302020-12-12T05:00:02+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (दि.११) जाहीर ...

Gram Panchayat election bell rings | ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक : १५ जानेवारी रोजी मतदान : मतमोजणी १८ रोजी

  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (दि.११) जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने गुलाबी थंडीत आता ग्रामीण भागातील राजकारण तापणार आहे. 
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतचा ५ वर्षांचा कार्यकाळ दोन महिन्यापूर्वीच पूर्ण झाला. मात्र कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होतेे. तेव्हापासून ग्रामपंचायच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. राजकारणातील प्रवेशाची ग्रामपंचायत ही पहिली पायरी समजली जाते. स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांर्भीयाने पाहतात. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता प्रतीक्षा संपली आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतची निवडणूक घेण्यात येणार आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतीपैकी १८९ ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. 
कोरोना संक्रमणाच्या कालावधीत या निवडणुका होत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 
 

सरपंचाची निवड करणार आता सदस्य 
यापूर्वी सरपंचाची निवड ही थेट जनतेत केली जात होती. मात्र आता निर्णयात बदल करण्यात आला असून सरपंचाची निवड ही निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य करणार आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. 
निवडणुका होणाऱ्या क्षेत्रात आचारसंहिता लागू 
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेल्या तारखेपासून निवडणुका होणाऱ्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही.  
 

असा आहे निवडणूक कार्यक्रम 
१५ डिसेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे 
 २३ ते ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करणे 
 ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी
 ४ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस.
 १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान 
 १८ जानेवारी रोजी मतमोजणी 
 २१ जानेवारी रोजी निवडणुकीच्या निकालाची अधि सूचना प्रसिध्द करण्याची शेवटी तारीख.
 

Web Title: Gram Panchayat election bell rings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.