ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जि.प.वर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:27+5:30
जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२९) स्थानिक जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चा जि.प.कार्यालयासमोर पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी निर्देश करुन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले.
जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. आकृतीबंधात सुधारणा करुन कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यात समाविष्ट करावे, म्हैसेकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेशंन लागू करावी, बबनराव कुचिक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार किमान वेतन देण्यात यावे. जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांना मंजुरी देऊन १० टक्के आरक्षणाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग ३ व ४ च्या पदावर सामावून घेण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात संघटन सचिव मिलिंद गणविर, चत्रुघन लांजेवार, सुखदेव शहारे, रविंद्र किटे, विष्णू हत्तीमारे, आशिष उरकुडे, सुनील लिल्हारे, महेंद्र भोयर, ईश्वरदास भंडारी, खोजराम दरवडे, बुधराम बोपचे, नरेश कावडे, विनोद शहारे यांचा समावेश होता.