ग्रामपंचायत कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:04+5:302021-08-18T04:35:04+5:30

वरिष्ठ प्राथमिक शाळा इंदोरा-बुज : वरिष्ठ प्राथमिक शाळेत सरपंच प्रभा अंबुुले यांच्या अध्यक्षतेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे ...

Gram Panchayat Office | ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

Next

वरिष्ठ प्राथमिक शाळा

इंदोरा-बुज : वरिष्ठ प्राथमिक शाळेत सरपंच प्रभा अंबुुले यांच्या अध्यक्षतेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लाखन राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक के.जे. शरणागत, चौरे, शहारे, रिनाईत, चव्हाण, प्रशांत काळे, खोब्रागडे आदी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संचालन नरेश चौरे यांनी केले. आभार शहारे यांनी मानले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

इंदोरा-बुज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात स्मारक समितीचे अध्यक्ष मुरलीदास गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत उपसरपंच दिनेश पटले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. शामराव गजभिये, अनिल मेश्राम, राजेंद्र बन्सोड, अशोक राऊत, गजेंद्र खांडेकर, तोरण सोनेवान, शिवशंकर सोनेवाने, संतोष असाटी, जगदिश असाटी, अतुल गोंडाणे, भाग्यलक्ष्मी गोंडाणे, विश्वपाल डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन राजेंद्र बन्सोड यांनी केले. आभार दिनेश राऊत यांनी मानले.

आदिवासी गोवारी स्मारक

इंदोरा-बुज : आदिवासी गोवारी स्मारकात सुखदास बिसेन यांच्या अध्यक्षतेत पोलीस पाटील हितेश सोनेवाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इसन आंबेडारे, बुद्धल राऊत, शेखर राऊत, टिलकचंद राऊत, रमेश, मारोती आंबेडारे आणि गावातील गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुनी ग्रामपंचायत कार्यालय

इंदोरा-बुज : जुनी ग्रामपंचायत कार्यालयात माजी पं. स. सदस्य राम अंबुले यांच्या अध्यक्षतेत से. स. संस्था अध्यक्ष हेमराज अंबुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुरलीदास गोंडाणे, चिंधू अंबुले, सोनू अंबुले, पिंटू अंबुले, विश्वजीत अंबुले आणी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Gram Panchayat Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.