बेवारस लाकडांवर ग्रामपंचायतची कुऱ्हाड
By admin | Published: October 4, 2015 02:38 AM2015-10-04T02:38:08+5:302015-10-04T02:38:08+5:30
ग्रा.पं. व वनविभागाच्या जागेवर बेवारस पडून असलेल्या लाकडांची विल्हेवाट ग्राम पंचायत करणार असल्याची माहिती सरपंच गजानन भूते यांनी दिली.
कालीमाटी : ग्रा.पं. व वनविभागाच्या जागेवर बेवारस पडून असलेल्या लाकडांची विल्हेवाट ग्राम पंचायत करणार असल्याची माहिती सरपंच गजानन भूते यांनी दिली.
ग्राम पंचायत कालीमाटीच्या हद्दीत तसेच वनविभागाच्या जागेवर बेवारस लाकडे ठेवण्यात आली आहेत. या लाकडांमुळे ग्रा.पं.तीला विविध कामांसाठी जागा अपुरी पडत आहे. म्हणून ग्रा.पं. वतीने बेवारस लाकडांविषयी गावात दवंडी दिली आहे.गावात तीन सॉ मिल आहेत. त्यामुळे येथील लाकूड व्यवसायीक बाहेरगावाहून फर्निचर तयार करण्यासाठी वृक्षांची खरेदी विक्री करतात. यामुळे बेवारस शासकीय किंवा अशासकिय जागेवर लाकडे जमा करुन ठेवतात. पण गावात विविध कामासाठी जागेचा अभाव आहे. गावात क्रिडांगण, व्यायामशाळा इतर उपयोगी कार्यासाठी जागा मोकळी करण्याची दवंडी ग्रा.पं.ने दिली आहे. त्यामुळे बेवारस लाकडांची निलामी तसेच तसेच वनविभागाच्या स्वाधिन केले जाईल असे सरपंच भुते यांनी सांगितले. कालीमाटी हे गाव मुख्यत: विविध जातीच्या लाकडांपासून स्वस्त दरात फर्निचर तयार करण्याचे केंद्र बिंदू आहे. येथील मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्राच्या अनेक शहरात सोफा, पलंग, डायनिंग टेबल, कॉन्टर आलमारी, सेंट्रींग, शोकेस, बेड, रॅक आणि घरगुती दरवाजे, खिडकी साहित्य तयार करतात. लाकडे हटविण्यासाठी खटाटोप सुरू आहे.