‘ग्राम उदय ते भारत उदय’

By admin | Published: April 20, 2016 02:05 AM2016-04-20T02:05:19+5:302016-04-20T02:05:19+5:30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंत भारत ...

'Gram Uday to India rise' | ‘ग्राम उदय ते भारत उदय’

‘ग्राम उदय ते भारत उदय’

Next


इसापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंत भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४ एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत ग्राम उदय ते भारत उदय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यालय इसापूर येथे अभियानाची सुरूवात १४ एप्रिलपासून करण्यात आली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.
या अभियानात पंचायतराज संस्थाचे बळकटीकरण, शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावणे, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे जीवनमान उंचावणे तसेच सामाजिक सलोखा नेहमीसाठी अबाधित राखणे, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, ग्रामविकास सभेच्या माध्यमातून कृषी सहायक बी.एन. येरणे यांनी १८ एप्रिलला ग्रामपंचायतमध्ये आयोजित ग्रामविकास सभेत कृषी विषयक माहिती दिली. तसेच सर्व शेतकऱ्यांना पीक विमा व इतर कृषी विषयक मार्गदर्शन केले.
या वेळी ग्रामविस्तार अधिकारी डी.एस. मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य दामोधर चांदेवार, ग्रा.पं. सदस्य डिगेश्वरी चांदेवार, ग्रा.पं. सदस्य सुनिता गेडाम, जेष्ठ नागरिक शालिकराम भोयर, कृषी सहायक बी.एन. येरणे, ग्रामरोजगार सेवक संतोष रोकडे, ग्रामपंचायत कर्मचारी सत्यपाल गेडाम व इतर मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Gram Uday to India rise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.