माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

By admin | Published: August 17, 2015 01:42 AM2015-08-17T01:42:23+5:302015-08-17T01:42:23+5:30

येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये १५ आॅगस्ट रोजी आमसभा पार पडली. यात १५०-१६० नागरिक सहभाग झाले होते.

Gramsevacha avoiding giving information | माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

Next

आमसभा : नागरिकांचा आरोप
बाराभाटी : येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये १५ आॅगस्ट रोजी आमसभा पार पडली. यात १५०-१६० नागरिक सहभाग झाले होते. या वेळी नागरिकांनी ग्रामसेवकास मागील सभेचे, कामकाजाचे व ग्रामपंचायतने विकासासाठी केलेल्या कामाचा हिशेब व खर्चाबाबत विचारणा केली. मात्र ग्रामसेवक निश्चित यांनी नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ करून त्यांच्या प्रश्नांची उडवाउडव केली.
सदर गावात ग्रामसेवक सात-आठ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या काळात ग्रामपंचायतने अनेक कामे केली. गावाचा विकास व्हावा असे प्रत्येकांना वाटते. परंतु बाराभाटी गावातील समस्या, अडचणी या अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी विचारणा केली, मात्र ग्रामसेवकाने उत्तर दिले नाही.
कमी खर्चाचे काम करून जास्त खर्चाचे बिले लावणे, खोटी माहिती देणे, केलेल्या कामाचा आढावा न घेता किंवा मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र न घेता कोणतेही कामे स्वमर्जीने करणे, अशी त्यांची कार्यप्रणाली असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सामान्य फंडातील चार ते पाच लाख रुपये जमा असताना गावाच्या समस्या दूर होत नाही. विकास होत नाही. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे २ लाख ४६ हजार रुपये जमा असताना या फंडाचा गाव विकासाला काहीही लाभ नाही. गावातील विद्युत व्यवस्था बरोबर नाही. रस्त्याची कामे बरोबर नाही. क्रीडांगणाचे काम व्यवस्थित नाही, यामध्येही घोळ असल्याचे बोलले जाते.
तसेच रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाही. ४० ते ५० मजुरांचे पैसे काही महिन्यापासून अद्यापही मिळाले नाही. अशा अनेक समस्यांची उत्तरे ग्रामसेवक निश्चित यांनी दिले नाही.
त्यामुळे सदर ग्रामसेवकाची तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी बाराभाटीच्या नागरिकांनी आमसभेत मागणी केली. (वार्ताहर)

Web Title: Gramsevacha avoiding giving information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.