कर्मचाऱ्यांच्या आत्म सन्मानासाठी ग्रामसेवक युनियन मैदानात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:22+5:302021-07-17T04:23:22+5:30

गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा गोंदियाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर.एल. पुराम, उपमुख्य ...

In Gramsevak Union Maidan for employees' self esteem () | कर्मचाऱ्यांच्या आत्म सन्मानासाठी ग्रामसेवक युनियन मैदानात ()

कर्मचाऱ्यांच्या आत्म सन्मानासाठी ग्रामसेवक युनियन मैदानात ()

Next

गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा गोंदियाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर.एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर यांना दिले आहे. निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्या विरोधात ग्रामसेवकांनी रोष व्यक्त केला आहे.

ग्रामसेवकांनी कोरोना सारख्या संकटकाळात मार्च २०२० पासून आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून जीवाची पर्वा न करता काम केले. नियमित कामकाजापासून तर पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, दिवाबत्ती व कोविड संबंधित व्यवस्थापनाची कामे ग्रामसेवकांनी यशस्वीरित्या पार पाडली. कोरोनासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय योजना असो किंवा लसीकरण जनजागृती असो या कामात सक्रिय सहभाग ग्रामसेवकांचा राहिला. पंतप्रधान आवास योजना, पीएम किसान योजना, कर्जमुक्ती इतर शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या लोकाभिमुख योजनेच्या कामात ग्रामसेवक यांचा मोलाचा वाटा आहे. कोरोनाची कामे करताना दोन ग्रामसेवकांना प्राणास मुकावे लागले. तरी देखील जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसेवकांची दखल न घेता ग्रामसेवकांवर विनाकारण कारवाई करीत आहेत. जि.प.ने पदोन्नती, कालबद्ध, पेन्शन प्रकरण, स्थायी प्रस्ताव, वैद्यकीय देयके सेवापुस्तके, मृतक कर्मचाऱ्याचे क्लेम व इतर कामे केली नाहीत. यामुळे ग्रामसेवक युनियन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करीत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा गोंदियाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर यांना दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सरचिटणीस दयानंद फटिंग, कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे, ओ.के. रहांगडाले, निशिकांत मेश्राम, शैलेश परिहार, गोपाळ चारथळ, संतोष कुटे, विजय बिसेन, चौहान, जोशी, सहारे, चौधरी, वाघमारे, ओ.जी. बिसेन, पारधी, मेश्राम, वैष्णव, अविनाश रहांगडाले व इतर ग्रामसेवक, महिला प्रतिनिधी आगाशे, माहुले, कोटवार, बिसेन, पारधी यांचा समावेश होता.

Web Title: In Gramsevak Union Maidan for employees' self esteem ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.