ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

By Admin | Published: August 13, 2016 12:26 AM2016-08-13T00:26:25+5:302016-08-13T00:26:25+5:30

तालुक्यातील ग्रामसेवकांनी १० आॅगस्टपासुन बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.

Gramsevak's work stop movement | ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

googlenewsNext

जनसामान्यांची कामे खोळंबली : अंशदायी पेंशन योजनेचा प्रश्न अधांतरी
मोहाडी : तालुक्यातील ग्रामसेवकांनी १० आॅगस्टपासुन बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना लागणाऱ्या दाखल्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मोहाडी तालुक्यातील ग्रामसेवकांनी पं.स. मोहाडी समोर आंदोलन सुरु केले आहे.
सन २००४ पासुन नियुक्त झालेल्या ग्रामसेवकांचे अंशदायी पेंशन अंतर्गत कपात केलेली रकमेचा हिशेब न मिळाल्यामुळे ग्रामसेवक संवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत निवेदन सुध्दा देण्यात आली. त्या अनुषंगाने एक आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद भंडारा समोर धरणे आंदोलन करण्यात आले. १० आॅगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु झाले असुन २३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात ग्रामसेवक संघाना मोहाडी तालुक्यातील डी. आर. गभणे, जी. एस. बुरडे, एस. एच. गिते, बि. जी. चव्हाण, एम. सी. चवळे, एस. व्ही. ब्राम्हणकर, डी. जी. बारस्कर, के. एम. पटले, ए.एस. सार्वे, आर.बी. बोरकर, डी. जी. तांबडे, बी.डी. लांजेवार, बी. टी. गिरीपुंजे, बि. ओ. कोकणी, व्ही. एम. डोमळे, एम. की. गायधने, एस. आर. धांडे, ए. एस. रामटेके, ए. एम. कोचे, जी. एस. बुरडे, एम. पी. हिरापुरे, बि.टी. मुरकुटे, आर. डी. बान्ते, एन. सी. खंडाळकर, ए. एस. कुंभलकर इत्यादी ग्रामसेवकांनी सहभाग नोंदविला.
या आंदोलनामुळे जनसामान्यांची अनेक कामे रेंगाळली आहेत. ग्रामसेवकांच्या समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Gramsevak's work stop movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.