त्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते सेवानिवृत्त वेतन मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:27 AM2021-05-17T04:27:14+5:302021-05-17T04:27:14+5:30

बोंडगावदेवी : जिल्ह्यातील मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांच्या सेवानिवृत्ती वेतन फाईल्स अडकून पडल्या आहेत. अशात त्यांना ...

Grant temporary retirement pay to those employees | त्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते सेवानिवृत्त वेतन मंजूर करा

त्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते सेवानिवृत्त वेतन मंजूर करा

Next

बोंडगावदेवी : जिल्ह्यातील मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांच्या सेवानिवृत्ती वेतन फाईल्स अडकून पडल्या आहेत. अशात त्यांना तात्पुरते वेतन मंजूर करा अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

अत्यंत जिव्हाळ्याचा सेवानिवृत्ती वेतनाचा प्रश्न निकाली लावण्यात यावा यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक जिल्हा गोंदिया यांनी दीपककुमार मीना जिल्हाधिकारी जिल्हा गोंदिया व प्रदीपकुमार डांगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना निवेदन पत्र दिले. कोविड-१९ या महामारीत महाराष्ट्र शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी केली आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन फाईल्स मंजूर करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त वेतन प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी कर्मचारी, शिक्षक व अधिकारी सेवानिवृत्त होऊनही पहिल्या महिन्यापासून त्यांना सेवानिवृत्त वेतन मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरिता सेवानिवृत्त वेतन फाईल्स अडकून पडलेल्या मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांना तात्पुरते वेतन मंजूर करावे अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

Web Title: Grant temporary retirement pay to those employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.