कोरोनाबाधितांचा ग्राफ पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:43+5:302021-04-02T04:30:43+5:30

गुरुवारी (दि.१) जिल्ह्यात १६७ रुग्णांची नोंद झाली, तर ५६ बाधितांनी मात केली. गुरुवारी आढळलेल्या १६७ रुग्णांमध्ये सर्वाधिक ८८ रुग्ण ...

The graph of corona lesions increased again | कोरोनाबाधितांचा ग्राफ पुन्हा वाढला

कोरोनाबाधितांचा ग्राफ पुन्हा वाढला

Next

गुरुवारी (दि.१) जिल्ह्यात १६७ रुग्णांची नोंद झाली, तर ५६ बाधितांनी मात केली. गुरुवारी आढळलेल्या १६७ रुग्णांमध्ये सर्वाधिक ८८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १८, गोरेगाव ११, आमगाव १७, सालेकसा ०४, देवरी ११, सडक अर्जुनी ८, अर्जुनी ९ आणि बाहेरील जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यासह आता सर्वच तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०३४६१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९०३२३ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत ८९१८९ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८२३४७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६२२७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १५१४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८९३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ६३१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर ३४९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

...........

जिल्हावासीयांनो दुर्लक्ष करू नका, नियमांचे पालन करा

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. अशात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तसेच कोरोनाकडे दुर्लक्ष न करता नियमांचे पालन करा.

.............

लॉकडाऊन नकोच सर्वांचाच सूर

कोरोनाबाधितांचा आलेख वाढत असल्याने लॉकडाऊन होणार का, अशी चर्चा आहे. मात्र लॉकडाऊन हे कुणालाच परवडण्यासारखे नाही. निर्बंध अजून कडक करा; पण लॉकडाऊन नकोच, असा सूर समस्त जिल्हावासीयांचा आहे.

Web Title: The graph of corona lesions increased again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.