शेतीतील अडचणीवर मात करण्यासाठी महाअ‍ॅग्रीटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:10 AM2019-01-16T01:10:24+5:302019-01-16T01:11:17+5:30

पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या महाअ‍ॅग्रीटेक योजनेला महाराष्ट्रात सुरूवात करण्यात आली आहे.

Great Aggregate to overcome the problems of agriculture | शेतीतील अडचणीवर मात करण्यासाठी महाअ‍ॅग्रीटेक

शेतीतील अडचणीवर मात करण्यासाठी महाअ‍ॅग्रीटेक

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ, जिल्ह्यातील शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या महाअ‍ॅग्रीटेक योजनेला महाराष्ट्रात सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे शेतीतील विविध अडचणीवर मात करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करताना सांगितले.
राज्य शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमातंर्गत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (दि.१४) जिल्ह्यातील शेतकरी बांधवांशी व्हिडिओ कॉन्सफरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या उपक्र मामुळे वेळीच माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे शक्य होणार आहे. एमआरसॅक आणि इस्त्रोच्या सहाय्याने राज्य शासन हा कार्यक्रम अंमलात आणत आहे. ‘महाअ‍ॅग्रीटेक’ची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीक नियोजन, पीकनिहाय पेरणी क्षेत्र यासंदर्भात संगणकीय प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शेती क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्र मांतर्गत केला जाणार आहे.
राज्यातील दीड कोटी शेतकºयांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाईल. उपग्रहाच्या मदतीने पीकनिहाय क्षेत्राचे मापन करताना पेरणी ते पीक काढणीपर्यंत पिकांच्या वाढीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पीक काढणीनंतर उत्पादनाचे अनुमान काढण्यास मदत होणार आहे. मुख्य म्हणजे शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी या तंत्रज्ञानामुळे मदत होणार आहे. हवामानातील बदलासह पिकावरील कीड, रोगांबाबत वेळीच माहिती मिळणार असल्याने तातडीच्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे. शेतीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेतकरी डिजिटली ट्रॅक करणारा हा देशातील पहिला उपक्र म असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी यावेळी सांगितल्या. शेतीशी निगिडत योजना आॅनलाईन केल्यामुळे गैरव्यवहारांना आळा बसला, पारदर्शकता आली, असे अनुभव शेतकºयांनी या वेळी सांगितले. सुमारे तीन तास मुख्यमंत्री विविध जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधत होते. त्यांच्या अडचणी जाणून घेत होते. काही शेतकºयांनी केलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. शेतकºयांच उत्पन्न वाढलं पाहिजे तरच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल. म्हणून २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित्त आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहे.
या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे. शेतीच्या प्रश्नांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Great Aggregate to overcome the problems of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.