अपघात टाळण्यासाठी आरएसपीची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:49 PM2018-01-13T23:49:57+5:302018-01-13T23:50:32+5:30

कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

 A great need of RSP to avoid accidents | अपघात टाळण्यासाठी आरएसपीची नितांत गरज

अपघात टाळण्यासाठी आरएसपीची नितांत गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षासंबंधी माहिती असणे किंवा वाहतुक नियमांविषयी जागरूकता असणे हे फार महत्वाचे आहे. वाहतूक नियमांचा आधार घ्यायचा यासाठी मुख्याध्यापकांनी आरएसपी या विषयाला प्राधान्य देऊन जीवन जगण्यासाठी व नियमांची जाणीव द्यावी असे आवाहन आरएसपी जिल्हा समादेशक जी.ए.लांजेवार यांनी केले आहे.
गोरेगाव येथे आयोजित वाहतुक नियमांविषयी मार्गदर्शन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
लांजेवार म्हणाले, अपघातांच्या घटना दररोज वर्तमानपत्रात वाचतात, परंतु त्यात कृतीशिलता नसते. १९६२ पासून आरएसपी हा विषय शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे. एसएससी बोर्डाने यास आरपीएस कोड दिलेला आहे.
ज्यामध्ये पदकवायत, वाहतूक नियंत्रण, बचावकार्य, अग्निशमन हे विषय आहेत. मुख्याध्यापक याकडे कानाडोळा करतात. एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झाला की कपाळाला हात धरुन बसतात. हे चित्र आपण डोळ्यांनी बघतो, परंतु बालवयापासून वाहतूक नियमांची जाणीव अर्थात ट्राफीक सेन्स याविषयी माहिती दिली तर अपघात टाळता येत असल्याचे सांगितले.

Web Title:  A great need of RSP to avoid accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.