शिक्षण व ज्ञान संपादन करणे ही सर्वात मोठी गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:37+5:302021-01-13T05:14:37+5:30
गोंदिया : देशातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेची माहिती असावी. सर्व वर्ग समुदायाने घटना वाचली व समजली पाहिजे. किमान त्यांच्या हक्कांबद्दल ...
गोंदिया : देशातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेची माहिती असावी. सर्व वर्ग समुदायाने घटना वाचली व समजली पाहिजे. किमान त्यांच्या हक्कांबद्दल घटनेत काय तरतूद आहे ते तरी जाणून घेतले पाहिजे. राज्यघटनेतील लेखी अधिकारांचे हक्क जर आपल्याला माहिती नसतील तर छळ व शोषण कायम राहील आणि गुलामांप्रमाणे जीवन जगावे लागेल. देशाचे नागरिक म्हणून, माणूस म्हणून आपण जीवन कसे जगावे, कसे राहावे, आमचे भवितव्य हे भारतीय राज्यघटनेतून कळते. यासाठी शिक्षण आणि ज्ञान संपादन करणे ही समाजाची सर्वात मोठी गरज असल्याचे संविधानाचे अभ्यासक विचारवंत शब्बीर पठाण यांनी केले.
राजमाता जिजाऊ, क्रां. सावित्रीमाई फुले, माता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त संविधान मैत्री संघ, अवामे मुस्लिम मदिना मस्जिद कमिटी व समता सैनिक दल यांच्या संयुक्त वतीने गौतमनगर परिसरातील मदिना मस्जिद चौक येथे आयोजित सामाजिक एकता संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला ओबीसी संघर्ष कृती समितीचे कोषाध्यक्ष कैलास भेलावे, उपाध्यक्ष तीर्थराज उके, ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ प्रमुख वसंत गवळी, युवा बहुजन मंचचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, छप्परबंद शाह बिरादरीचे सदर अफजल शाह, मदिना मस्जिद कमिटीचे सदर ईशान शेख, सम्यक सम्बुद्ध बुद्धविहारचे अध्यक्ष बाबुराव जनबंधू, माजी नगरसेवक हेमंत बडोले, संविधान मैत्री संघाचे संरक्षक मित्र आभा मेश्राम, लक्ष्मी राऊत, आंबेडकरी संस्कार केंद्र प्रशिक्षक माणिक गोंडाणे, युवा प्रतिनिधी चेतना रामटेकर, फिरदोस खान उपस्थित होते. याप्रसंगी याप्रसंगी उके यांनी, मानवता धर्म हा सर्वोच्च धर्म आहे. समाजात मानवतावादी विचार पेरणारे संत-गुरू-महामानव यांच्या मार्गाचा अवलंब केल्याने आपण स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करू शकतो आणि समस्यांपासून मुक्त होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. संचालन अतुल सतदेवे यांनी केले तर आभार कठाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तैसीम शाह, मोहम्मद सलीम, सय्यद मुनीर, मो. नसीम शेख, सलीम कुरेशी, संजू यादव, नसीम शाह, रफिक शेख, युसूफ शेख, विनोद तुरकर, आरिफ कुरेशी, प्रेमलाल मेश्राम, द्रवींद्र मेश्राम, हंसराज बनसोड, रोशन शेख, प्रवीण बेलगे, सोहेल शेख, शुभम ठाकूर, दीपक हरिणखेडे, राहुल वालदे, आकाश ढोमणे, हैदर अली सय्यद यांनी सहकार्य केले.