नागरी सुविधांच्या ७ कोटी ३३ लाखांच्या कामांना हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:10+5:302021-08-26T04:31:10+5:30
प्रतिनिधी : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील नागरा, काटी, कटंगीकला, फुलचूर, फुलचुरटोला, कामठा, पिंडकेपार, कारंजा, खमारी, कुडवा व पाच हजार ...
प्रतिनिधी : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील नागरा, काटी, कटंगीकला, फुलचूर, फुलचुरटोला, कामठा, पिंडकेपार, कारंजा, खमारी, कुडवा व पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये वर्ष २०२०-२१ मध्ये ७ कोटी ३३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे इतिहासात प्रथमच नागरी सुविधा योजनेअंतर्गत पथदिवे, वॉटर प्युरिफायर, कचरा वाहनांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ७ कोटी ३३ लाखांच्या कामांमध्ये ग्रामपंचायत, कुडवा ७७ लाख ५० हजार, ग्रामपंचायत, खमारी ४७ लाख, ग्रामपंचायत, नागरा ७० लाख, ग्रामपंचायत, काटी ६५ लाख ५० हजार, ग्रामपंचायत, कटंगीकला ७० लाख, ग्रामपंचायत, फुलचुरटोला ६८ लाख, ग्रामपंचायत, फुलचूर ९७ लाख ५० हजार, ग्रामपंचायत, कामठा ६७ लाख, ग्रामपंचायत, पिंडकेपार ५३ लाख, ग्रामपंचायत, कारंजा ५७ लाख अशा एकूण ७ कोटी ३३ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. मागील दोन वर्षात कोरोना संकटाच्या काळातही आ. विनोद अग्रवाल यांनी विकासकामांचे चाक थांबू दिले नाही. यापूर्वी नागरी सुविधा योजनेअंतर्गत केवळ रस्ते, नाले अशी कामे मंजूर करण्यात आली होती. गावाची लोकसंख्या अधिक असल्याने पथदिव्यांची, पिण्याच्या पाण्याची, कचरा वाहनांची समस्या, मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक समस्या निर्माण होत होत्या. आ. अग्रवाल यांना याची माहिती होताच त्यांनी ही बाब लक्षात घेतली. या कामांसाठी आता निधी मंजूर झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.