बागेत साकारतेय ‘ग्रीन जीम’
By Admin | Published: March 5, 2017 12:14 AM2017-03-05T00:14:32+5:302017-03-05T00:14:32+5:30
शहरातील सुभाष बागेतील हिरवळीत फेरफटका मारणाऱ्यांना आता शारिरीक व्यायामाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे.
२.९० लाखांचा खर्च : विविध प्रकारचे साहीत्य लागणार
गोंदिया : शहरातील सुभाष बागेतील हिरवळीत फेरफटका मारणाऱ्यांना आता शारिरीक व्यायामाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. कारण बागेत ‘ग्रीन जीम’ साकारत असून त्याला लाभ सर्वांना घेता येणार आहे. २.९० लाख रूपयांचा यासाठी खर्च केला जात आहे.
शहरात एकमात्र सुभाष बाग असून शहरातील प्रत्येकच भागातून नागरिक येथे येतात. मोक ळ््या वातावरण व हवेत काही काळ घालविण्यासाठी तसेच फेरफटक्यातून आपले आरोग्य सांभाळण्यासाठी बागेत नागरिकांची गर्दी असते. सकाळी व सायंकाळीही यामुळेच आता बागेत नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. शिवाय आपल्या चिमुकल्यांना घेऊन येणारे पालकही आता बागेत दिसताहेत. यात चिमुकल्यांपासून तरूण ते वृद्धांचाही समावेश आहे. आतापर्यंत फक्त फेरफटका मारूनच या सर्वांना परतावे लागत होते.
अशात मात्र मोकळ््या वातावरणात थोडाफार शारिरीक व्यायामही या नागरिकांना करता यावा, या दृष्टीने नगर परिषदेने बागेत व्यायामाचे साहीत्य लावण्याबाबतचा ठराव जानेवारी २०१६ मधील आमसभेत घेतला होता. मात्र त्यानंतर निवडणुकांना बघता हे काम टाळण्यात आले अन्यथा दिवाळी पर्यंतच हे काम झाले असते. अशात आता निवडणुका आटोपल्या नंतर पदभार सांभाळणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हे काम हाती घेतले.
मोकळ््या जागेत लावण्यात येत असलेल्या क्रीडा साहीत्यांना ‘ग्रीन जीम’ म्हटले जाते. याचे काम नागपूरच्या एका एजंसीला देण्यात आले आहे. २.९० ाख रूपयांचा खर्च या जीमवर केला जात आहे. स्थानिक स्तरावर गज्जू नागदेवे यांना ही जबाबदारी देण्यात आली असून शनिवारी (दि.४) बागेत जीममधील साहीत्य बसविण्याचे काम करण्यात आले. या जीमचे काम झाल्यास बागेत वॉक साठी येणाऱ्यांना शारिरीक व्यायामही करता येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
आठ प्रकारचे साहित्य लागणार
‘ग्रीन जीम’ मध्ये आठ प्रकारचे साहित्य लावण्यात येणार आहेत. यामध्ये बॅक एक्सटेंशन, बॅलेंसींग, चेस्ट प्रेशर, शोल्डर प्रेशर, टिष्ट्वस्टर, वॉकर, डबल क्रॉस व सायकलींगचा समावेश आहे. बागेत प्रवेश करताच हे ग्रीन जीम नागरिकांच्या नजरेत पडणार आहे. मोकळ््या जागेत लावण्यात आले असल्याने कुणीही यावर शारिरीक व्यायाम करू शकतील. विशेष म्हणजे महिलाची या जीममध्ये व्यायाम करू शकतील.
क्रीडा साहित्यांकडे दुर्लक्ष
‘ग्रीन जीम’चे हे काम कौतूकास्पद असतानाच नगर परिषद प्रशासनाचे चिमुकल्यांच्या क्रीडा साहीत्याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. बागेत असलेले लहान मुलांचे क्रीडा साहीत्य गेल्या कित्येक वर्षांचे आहेत. अगोदरच मोजके साहीत्य बागेत असून त्यातील काही साहीत्य तुटलेले आहेत. अशात चिमुकल्यांना मोजक्या साहीत्यांवर मनमुराद खेळताही येत नाही. पालिका प्रशासनाने क्रीडा साहीत्यही लावण्याची मागणी असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.