भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:26 AM2021-03-24T04:26:54+5:302021-03-24T04:26:54+5:30
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी.एच. जीवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एच. एच. नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यू.सी. रंहागडाले, एस.आर.बघेले, ...
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी.एच. जीवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एच. एच. नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यू.सी. रंहागडाले, एस.आर.बघेले, प्रा.सुनील लिचडे, प्रा.एस.सी. सुंकरवार, क्रीडा प्रभारी जी.एम.दुधबरई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या छायाचित्रासमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी दूधबरई व जीवानी यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सहायक शिक्षक डी.एस. साखरे यांनी केले. आभार विनोद माने यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील प्रा. राजेश चटर्जी, एस.एन. मोरघडे, डी. जे. डोमळे, राजेश निमावत, नरेंद्र अग्रवाल, पी.एम. राठोड, पी.जी. परशुरामकर, एम.पी. भोयर, एन.ए. बुराडे, प्रा. अर्चना उपवंशी, प्रा. प्रियंका भालाधरे, प्रा. रवी लिल्हारे, प्रा. पटले, विजय वासनिक, कान्हा बघेले, आर.बी. दमाहे, एम.सी. कोल्हाटकर, शक्ती मस्करे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.