जिल्ह्यात गांधी व शास्त्रीजींना अभिवादन

By admin | Published: October 3, 2015 01:40 AM2015-10-03T01:40:30+5:302015-10-03T01:40:30+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.

Greetings to Gandhi and Shastriji in the district | जिल्ह्यात गांधी व शास्त्रीजींना अभिवादन

जिल्ह्यात गांधी व शास्त्रीजींना अभिवादन

Next

गोंदिया : राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. या दोन्ही महापुरूषांच्या विचारांची आज खरी गरज असून त्यांना आत्मसात करण्याचे विचारही व्यक्त करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंँग्रेस पक्ष
गोंदिया : कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमदार राजेंद्र जैन यांनी, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांना आत्मसात करून पक्ष संघटनेला नवीन दिशा देण्याचा संकल्प करूया, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला देवेंद्रनाथ चौबे, घनश्याम मस्करे, सुरज गुप्ता, पदमचंद जैन, हुकूमचंद अग्रवाल, आशा पाटील, रवी मुंदडा, केतन तुरकर, सुर्यकांत जायस्वाल, शंकर सहारे, झलकसिंह बिसेन, नानू मुदलीयार, रमा जायस्वाल, सुनील जायस्वाल, गुड्डू बिसेन, दीपक कनोजे, प्रितपालसिंग होरा, मनोज जोशी, रोशन उके, योगेश बिरनवार, सोनू येळे, राजेश चौधरी, स्नेहल हरिणखेडे व अन्य उपस्थित होते.
एस.एस.गर्ल्स हायस्कूल
गोंदिया : शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.फुंडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला जी.एस. ठाकूर तसेच शाळेचे पर्यवेक्षक एन.बी. बिसेन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले. मुख्याध्यापिका फुंडे यांनी महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच अहिंसा दिवस व स्वच्छता दिवस यांच्यावर मार्गदर्शन केले. शाळेचे पर्यवेक्षक बिसेन यांनी सुद्धा विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मनोहर म्युनिसिपल हायर
सेंकडरी स्कूल
गोंदिया : नगर परिषद गोंदिया द्वारा संचालित मनोहर म्युनिसिपल हायर सेंकडरी स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत रत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अहिंसा दिवस आणि स्वच्छता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सहायक प्रधानाध्यापक नरेंद्र गणवीर, पर्यवेक्षक राजेंद्र धाबर्डे, सहायक शिक्षक रविशंकर बिसेन, हेमराज शहारे, भुवन बिसेन, हेमराज बोकाडे, सुधीर रहांगडाले, दीप्ती तावाडे व अजेशकुमार टेकाम प्रामुख्याने हजर होते. महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री या महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विक्रांत फुंडे, रित्रीका फुंडे, उन्नती बांडेबुचे, लौकिक दहीकर, आचल मस्के, अतिश शेंडे या विद्यार्थ्यांनी गीत, प्रेरक प्रसंग व कविता सादर केल्या. जयंती निमित्त विद्यार्थ्यांची निबंध लेखन स्पर्धा व देशभक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संचालन करून आभार विद्यार्थी सलीम पठाण यानी मानले. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षक दामोदर पुवारे, सुलभा चौधरी, शारदा कुंभरे, मधुकर जाधव, प्रमोद सोनवाने, शिवकुमार उपरीकर व शालेय मंत्रीमंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.
पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
मक्काटोला : महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी. मेश्राम यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आर.एम. मटाले व प्राध्यापक आर.एन. भेलावे कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य मेश्राम व पाहुण्यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करुन माल्यार्पन केले. तसेच इयत्ता १२ वी ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी गीत व भाषण सादर केले. संचालन प्राध्यापक यु.एल. वलथरे यांनी केले. आभार शिक्षिका डी.एस. साखरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाबूराव मडावी विद्यालय
देवरी : शाळेचे मुख्याध्यापक आर.एस.गायधने यांच्या अध्यक्षतेत आयोजित लालबहादुर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाला व्ही.एम.नवखरे, डी.एस.खेडीकर, एस.एस.बुराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले. तर पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दामिनी रामरामे हिने मांडले. संचालन प्रतीक्षा बांबोळे हिने केले. आभार मोनम तागडे हिने मानले. पश्चात मुख्याध्यापक गायधने यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेत स्वच्छता मोहीम राबविली. तर वंदेमातरम् या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
देवरी : संस्था सहसचिव अनिल येरणे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मनोज भुरे, जी.एम.काशिवार व भांडारकर उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाचे निमित्त साधून नवनिवार्चित पंचायत समिती सदस्य महेंद्र मेश्राम यांचा शाळ व श्रीफळ देऊन तर महाआयटी जिनीयस टेस्टमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अरूण भरडे याचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर सोबतच मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींना सायकलचे वितरण संस्था सहसचिव येरणे व पंचायत समिती सदस्य मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
संचालन एस.जी.काशिवार यांनी केले. प्रास्तावीक मनोज भुरे यांनी मांडले. आभार एम.आर.तांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पं. दीनदयाल जयंती साजरी
सडक-अर्जुनी : नेहरु युवा केंद्रातर्फे पं. दीनदयाल उपाध्याय जयंती गुरूवारी यशोधरा युवा मंडळ शहारवाणी येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी के.के. जाधव यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे ए.वाय. टेंभरे, एस.एल. बडोले, बी.टी. चौधरी, पोर्णिमा वासनीक उपस्थित होते. निमित्त पोर्णिमा वासनीक यांनी पं. उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शहारवाणी गावातील नागरीक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन करून आभार बडोले यांनी मानले.

Web Title: Greetings to Gandhi and Shastriji in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.