मैत्री संघाद्वारे महामानवांना अभिवादनपर घर घर जयंती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:53+5:302021-04-18T04:27:53+5:30
गोंदिया : संविधान मैत्री संघ, सर्वसमाज जयंती समारोह समिती, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीमार्गाने विचारक्रांती हा उद्देश ...
गोंदिया : संविधान मैत्री संघ, सर्वसमाज जयंती समारोह समिती, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीमार्गाने विचारक्रांती हा उद्देश ठेवून सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा फुले, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत घर घर जयंती जागृती सप्ताह ऑनलाइन कार्यक्रमअंतर्गत विविध कलात्मक, साहित्यिक, बौद्धिक स्पर्धा सीनियर व ज्युनिअर गटात घेतल्या गेल्या. शंभरच्या घरात स्पर्धकांनी भाग घेतला.
८ एप्रिलला बोधकथा कथन, सम्राट अशोक जीवनावली वरील प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या, बोधकथा कथनमध्ये सीनिअर गटातून : प्रियांका गणवीर प्रथम, धनराज दुर्योधन व्दितीय, मृणालिनी दहिवडे, तृतीय तसेच ज्युनिअर गटातून पलक किरणापुरे प्रथम, आशिता चौरे द्वितीय, अंगद भालाधारे तृतीय, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सीनिअर गटातून लक्ष्मी राऊत प्रथम, प्रणय राऊत द्वितीय, राहुल वालदे तृतीय, ज्युनिअर गटातून विशाखा सोनटक्के, प्रथम, आर्यन बन्सोड द्वितीय, अलिशा चौहान तृतीय, ९ एप्रिलला कविता वाचन स्पर्धा, सीनियर गटातून लोपमुद्रा शहारे प्रथम, प्रतिमा रामटेके द्वितीय, प्रणय गजभिये तृतीय, ज्युनिअर गटातून: सक्षम लाऊल प्रथम तर सम्राट अशोक कालीन फोटो संकलन स्पर्धेमध्ये सीनिअर ग्रुपमध्ये मंगेश सतदेवे प्रथम, प्रियांका गणवीर द्वितीय, ज्युनिअर गटात स्नेहा मेश्राम प्रथम, निखिल भालेराव द्वितीय, श्रेयश टेंभेकर तृतीय, १० एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा सीनिअर गट धीरज डोहणे प्रथम, मृणालिनी दहिवडे द्वितीय, स्नेहा राऊत तृतीय तर ज्युनिअर गट विदिशा गजभिये-प्रथम, आर्यन बन्सोड-द्वितीय क्रमांक पटकाविला. कोरोना महामारीच्या विचारात गुंतून न राहता, महामानवांच्या विचारांचानुरूप समाजनिर्मिती- बंधुभाववृद्धीकरिता व १४ एप्रिलला बाहेर न निघता घरी राहून महामानवांना आदरांजली द्यावी व सर्वांच्या आरोग्यसंपन्नतेकरिता प्रार्थना करावी याकरिता घर घर जयंती उपक्रम हे एक पाऊल होते.