कलेतून पेटवली ‘चूल’

By Admin | Published: September 15, 2016 12:34 AM2016-09-15T00:34:28+5:302016-09-15T00:34:28+5:30

धर्मसंस्कृती व सणासुदीला महत्व देऊन आपल्यात कला कौशल्य असेल तर बेरोजगारीवर मात करता येते.

'Grinders' | कलेतून पेटवली ‘चूल’

कलेतून पेटवली ‘चूल’

googlenewsNext

राजीव फुंडे  कालीमाटी
धर्मसंस्कृती व सणासुदीला महत्व देऊन आपल्यात कला कौशल्य असेल तर बेरोजगारीवर मात करता येते. याचा प्रत्यय आमगाव येथील हफीज अनवर शेख याने दिला. विविध धर्म, जातीच्या सण-उत्सवात निरनिराळे देखावे तयार करण्याचा छंद त्याचा रोजगार झाला आहे.
एका गरीब कुटूंबातील हफीज शेख याचे वडीलाचे छत्र हरविल्याने आईने मजूरी करून हफीजला उच्चशिक्षण दिले. त्याने बीकॉम, डिजाईनर आर्टस (आंतरीक सजावट) चे शिक्षण घेऊन अठराविश्वे दारिद्रयावर मात करण्याचा माणस बांधला. दुख:च्या अश्रूना आनंदात परिवर्तीत करण्याची धडपड त्याला कधी वाटलेही नव्हती. त्याचा छंद जीवनाचा आधार बनेला. आणि त्याने आता मागे वळून पाहिले सुध्दा नाही.
आमगावच्या गांधी चौकातील छोट्याशा घरात हफीज आई व भावासोबत राहतो. कुटूंबाची जवाबदारी त्याच्यावर आली. घरी चूल पेटावी, म्हणून त्याने आपल्यातील कला कौशल्याला वाव देऊन ते व्यवसात परिवर्तीत केले. सन २०११ मध्ये हफीजने गणेश उत्सवादरम्यान टाकाऊ वस्तू आणि थर्माकोलपासून सुंदर मंदिराचे देखावे तयार केले. जाती, पंथ व धर्म बाजूला सारून प्रत्येक सनासुदीला, दुर्गापूजा, गणेश दर्शन, पोळा, गौरीपूजा, दिवाळी, ईद, क्रिसमस, दसरा, आंबेडकर जयंती व इतर उत्सवात निरनिराळे देखावे तयार करतो.
आपल्या हाताच्या कुंचल्यातून क्राफ्ट आर्ट, वॉल आर्ट, पेंटीग मिरलस, उडन आर्ट, घरांची सजावट व अभियांत्रीकी डिजाईन तयार करीत आहे. त्याच्या हातून साकार झालेली वस्तु हुबेहुब साक्षात प्रतिकृती व प्रतिबिंब असते.
हे गुण याच्या गुणांना पाहुन एका खाजगी शाळेने शिकवणीसाठी ठेवल्याची माहिती हबीजने दिली. हफीज महिन्याकाठी १० ते १२ हजार रुपये कमवून घेतो. स्वत:तील कला मी शोधला नसतो तर आज मी पानटपरीवर काम करीत असतो, आज माझ्याकडे मानसन्मान व आर्थिक पाठबळ आहे ते फक्त माझ्या कलेतून असे हफीज म्हणाला.
अनेक बेरोजगार युवकांमध्ये सुप्त गुण असतात पण त्यांनी आपल्यात असलेली कला चार भिंतीमध्ये दडवून ठेवलेली असते. त्या भींतीना तोडून जिद्द मेहनतीने कलेला समाजासमोर मांडला पाहिजे मग स्वत: रोजगार निर्मिती करणे सोयीस्कर जाते असे त्याचे मत आहे.

Web Title: 'Grinders'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.