समूह गट सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 09:13 PM2017-09-08T21:13:00+5:302017-09-08T21:13:17+5:30

समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही.

Group group is beneficial for organic farming farmers | समूह गट सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी फायदेशीर

समूह गट सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी फायदेशीर

Next
ठळक मुद्देकृषी अधिकारी तुमडाम : भरणोली येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : समाजात वावरत असताना आजघडीला एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत नाही. प्रत्येक कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचे तुकडे पडतात. लहान-लहान शेतजमिनीच्या आकारात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेता येत नाही. शेतीमधून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन सामूहिक गट सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी दिला.
मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नवेगावबांध अंतर्गत येणाºया भरणोली येथे समाज मंदिरात समूह गट सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यासंदर्भात आयोजित ग्रामस्थांच्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. तसेच सरपंच प्रमिला कोरामी, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, माजी पं.स. सभापती तानेश ताराम, तंमुस अध्यक्ष कन्हैयालाल राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकºयांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी तुमडाम म्हणाले, दिवसेंदिवस शेतजमिनीचे भावाभावांमध्ये हिस्सेवाटे होत असल्याने जमिनीचे विभाजन होत आहे. पर्यायाने शेतीशी निगडीत नवनवीन तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करुन शेतीची मशागत करणे अशक्य होत आहे. विपणन पद्धत, काढणीनंतर प्रक्रिया करणे, प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन, शेतीपूरक जोडधंदे उभारणे शक्य होत नाही. या समस्यांवर मात करण्यासाठी गावातील शेतकºयांनी एकत्र येवून समूह गट शेती करण्यासाठी पुढे येणे काळाची गरज आहे, असे सांगून समूह गट शेती प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके यांनी समूह सेंद्रिय गट शेतीसंबंधी मार्गदर्शन करताना म्हणाले, शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात कीटकनाशके व रासायनिक खताचा वापर केला जातो. काही ठिकाणी अमर्याद मात्राचा डोस दिला जातो. त्यामुळे त्याचा आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. शेती करताना खर्चाला आळा बसणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती सामान्य शेतकºयांना परवडणारी आहे. सेंद्रिय शेती केल्याने शेतकºयांचा निविष्टांवर होणाºया खर्चाची बचत होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सेंद्रिय शेतीमधून उत्पादित केलेल्या मालाला मनाप्रमाणे भाव मिळून जास्तीत जास्त आर्थिक फायदा निश्चितपणे मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शेतकºयांनी एकत्र येत शेती करण्याचे आवाहन केले.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेतीबाबद शेतकºयांना माहिती दिली. संचालन व आभार कृषी सहायक मोतीलाल येळणे यांनी केले. मार्गदर्शन सभेला गावातील महिला-पुरुष शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Group group is beneficial for organic farming farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.