सामूहिक विवाह काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:58 AM2018-04-21T00:58:34+5:302018-04-21T00:58:34+5:30
तालुक्यात महादुष्काळ पडला असूनसुद्धा शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीतही आदिवासी समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यात महादुष्काळ पडला असूनसुद्धा शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीतही आदिवासी समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अशा सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील लोक एकत्र होतात. अशा सोहळ्यांमुळे लोकांची आर्थिक बचत, वेळेची बचत व एकत्रीकरण होते. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून असे सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
ते आदिवासी हलबा-हलबी समाज सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.१५) आदिवासी समाजाच्या २७ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा क्रांतीवीर बिरसा शक्ती मैदानात पार पडला. या वेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. रामरतन राऊत, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, डॉ. नामदेवराव किरसान, सालेकसाचे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, माजी समाजकल्याण सभापती देवराज वडगये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, नगरसेवक यादोराव पंचमवार, जि.प. सदस्य उषा शहारे आणि बी.टी. राऊत यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, युवक वर्ग व वºहाडी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यात लग्न करणाºया आदिवासी समाजाच्या २७ वर-वधू जोडप्यांचा विवाह समिती तथा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू व भावी वैवाहिक सुखी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान आ. संजय पुराम, माजी आ . रामरतन राऊत, डॉ. नामदेवराव किरसान, रमेश ताराम, भरतसिंग दुधनाग, उषा शहारे व बी.टी. राऊत आदींनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक आदिवासी समाज सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष हिरालाल भोई यांनी मांडले. संचालन करून आभार सविता उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी आदिवासी समाज सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष हिरालाल भोई, उपाध्यक्ष राधेशाम भोयर, सचिव भोजराज घासले, सहसचिव शंभू राऊत, कोषाध्यक्ष दामोदर गावड, सहकोषाध्यक्ष मानिक भंडारी, संघटक मधू दिहारी, दिलीप राऊत, सोमा ताराम, गणेशराम गावडकर, कविता उईके, आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना तालुका शाखा देवरीचे अध्यक्ष प्रेमलाल पिहदे, उपाध्यक्ष तुकाराम राणे, सचिव मारूती मेळे, संघटक तथा मार्गदर्शक रामचंद्र राऊत, काशिनाथ ईश्वर, शिवलाल गावडकर, महिला समितीच्या सुनिता गावडकर, ललीता राऊत, शोभा घरत, सरिता दिहारी, गीता कुरसुंगे आदिंनी सहकार्य केले.