पालकमंत्र्यांना घातला घेराव

By admin | Published: August 16, 2014 11:33 PM2014-08-16T23:33:53+5:302014-08-16T23:33:53+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर शासनाकडून काय पावले उचलण्यात आलीत या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर न देता गाडीतून निघण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्र्यांना येथील नाग विदर्भ आंदोलन समितीच्या

Guarded to Guardian Minister | पालकमंत्र्यांना घातला घेराव

पालकमंत्र्यांना घातला घेराव

Next

विदर्भवाद्यांचे आंदोलन : दिले मागण्यांचे निवेदन
गोंदिया : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर शासनाकडून काय पावले उचलण्यात आलीत या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर न देता गाडीतून निघण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्र्यांना येथील नाग विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला. याप्रसंगी समितीच्यावतीने पालकमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जवळील ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर नाग विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दावर शासन काय पाऊल उचलत आहे हा प्रश्न विचारला.
यावर मात्र पालकमंत्री देशमुख त्यांना उत्तर न देता गाडीत बसण्यासाठी निघाले असता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला व मागण्यांचे निवेदन दिलेत. तसेच रागात असलेल्या विदर्भवाद्यांनी नारेबाजी करीत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील जनता त्यांना याचे परिणाम दाखवून देतील असा इसारा दिला.
याप्रसंगी नाग विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, फॉरवर्ड ब्लॉकचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडे, रमेश ढोमणे, हामिद अली सिद्दीकी, बलदेव सोनेवाने, सुरेश लालवानी, राजधर भेलावे, दीपक डोहरे, मिना डुमरे, भूपेंद्र पटले, लता मानकर, पूजा कालसर्पे, नागेश मिश्रा व अन्य उपस्थित होते.

Web Title: Guarded to Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.