पालकमंत्र्यांची अपेक्षा : पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Published: August 18, 2016 12:26 AM2016-08-18T00:26:48+5:302016-08-18T00:26:48+5:30

समाजाच्या वेदना पुढे आणण्याचे काम पत्रकार करतात. समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असते.

Guardian Expectations: Press Association Award distribution ceremony | पालकमंत्र्यांची अपेक्षा : पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्र्यांची अपेक्षा : पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा

Next

गोंदिया : समाजाच्या वेदना पुढे आणण्याचे काम पत्रकार करतात. समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मात्र या लेखनीचा वापर करताना या क्षेत्रातील मर्यादेचे भान पत्रकारांना राहिले तर ते समाजासाठी उपयोगी ठरेल. पत्रकारांनी निर्भिडपणे टीका करावी, मात्र ती विधायक स्वरु पाची असावी, अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राईस मिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गुड्डू कारडा यांच्यासह एच.एच.पारधी, संजय राऊत, भगत ठकरानी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते भगत ठकरानी यांचा टिळक गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. स्व.मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कार मोहन पवार, स्वातंत्र्य सैनिक स्व.हिरालाल जैन विकास वार्ता प्रथम पुरस्कार राधेशाम भेंडारकर व द्वितीय पुरस्कार रितेश अग्रवाल यांना, वृत्तवाहिनी प्रथम पुरस्कार हरीश मोटघरे व द्वितीय पुरस्कार रवि सपाटे यांना, स्व.संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता प्रथम पुरस्कार राजू दोनोडे व प्रमोद नागनाथे यांना, तसेच उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्वतंत्र छायाचित्रकार प्रा.शरद मेश्राम यांना देण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये किशोर काळबांडे, सायी गाडेगोणे, चंचल अग्रवाल, आसमा खान व अनुश्रेय भोयर यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शब्दकोष, पर्यटन पुस्तिका व रोख पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्र मासाठी उदय चक्र धर, महेंद्र बिसेन, बाबाभाई शेख, सुरेश येळे, भरत घासले, विकास बोरकर, महेंद्र माने, आनंद मेश्राम, देवेंद्र बिसेन, प्रमोद भोयर, रु षी कावळे, नवीन अग्रवाल, दिलीप लिल्हारे, मनीष मुनेश्वर, विजय लाटा यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक चंद्रकुमार बहेकार यांनी केले. खेमेंद्र कटरे यांनी पुरस्कारांबद्दल माहिती दिली. संचालन सावन डोये यांनी केले.
आसगाव येथे तंबाखू विक्री जोमात
आसगाव : आरोग्याची धुळखाणी मांडत अख्या भंडारा जिल्ह्यात तंबाखुची विक्री पानठेला व किराणा दुकानातून खुलेआम होत आहे. आरोग्य अधिकारी व अन्न प्रशासनाची होत असलेली डोळेझाक अक्षम्य होत आहे. पुरुषांच्या बरोबरीने आता महिलाही तंबाखुच्या व्यसनात गुरफटल्याने तंबाखु विक्री खुलेआम वाढली आहे. कायद्याची भिती नसल्याने व अधिकारी लबाड झाल्याने व्यापाऱ्यांचे फावले आहे.

Web Title: Guardian Expectations: Press Association Award distribution ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.