वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

By admin | Published: May 9, 2017 12:56 AM2017-05-09T00:56:15+5:302017-05-09T00:56:15+5:30

वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले.

Guardian Minister's visit to the forest department picture | वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, सहायक वन संरक्षक श्री.बिसेन, श्री.शेंडे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा क्र ीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्र माला उपस्थित होते.
बिघडलेले पर्यावरण संतुलन आणि जागतिक तापमान वाढीमुळे वृक्ष लागवड करणे ही आज काळाची गरज झाली आहे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीत लोकसहभाग मिळावा आणि मोहिमेला लोकचळवळीचे स्वरु प यावे यासाठी वन विभागाने चित्ररथ तयार केले असून १ मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
वन विभागाचा हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. हा चित्ररथ राज्यभर भ्रमण करणार असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे व ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथाच्या मागच्या भागात मोठी डिजीटल स्क्र ीन असून ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. १ मे ते ३० जून पर्यंत हा चित्ररथ चांदा ते बांधा असा महाराष्ट्रभर प्रवास करु न सर्वच जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.
सडक अर्जुनीत स्वागत
सडक अर्जुनी : रविवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजता शेंडा फाटा येथे चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती कविता रंगारी, नगराध्यक्ष रिता लांजेवार, माजी आमदार दयाराम कापगते, नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम, कोहमाराच्या सरपंच माया उईके, वनक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, क्षेत्र सहायक प्रमोद फुले, विलास बेलखोडे, सुनील खांडेकर, नागपुरे, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, राजेश कठाणे, लिना पटोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनाचे महत्व, वृक्षारोपण काळाची गरज, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देण्यात आली.
चित्ररथाला हिरवी झेंडी
सालेकसा : पर्यावरणाचा संतुलन साधण्याच्या दिशेने काम करणे गरजेचे असून यासाठी वृक्ष संरक्षण व वृक्ष संवर्धन सारखे उपक्रम गांभीर्याने राबविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम हाती घेतला असून लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी चित्ररथ यात्रा काढण्यात येत आहे. या चित्ररथाचे नुकतेच सालेकसा येथे आगमन झाले. त्यावेळी वन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर चित्ररथाचे भव्य स्वागत केले.
वृक्ष लागवडीचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाचे स्वागत करण्यासाठी सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्राधिकारी पी.एस. मेंढे, एस.के. पटले, एस.ए. घुघे, पी.बी. साखरे, वनरक्षक एम.व्ही. शामकुवर, एस.आर. सोनवाने, एम.आर. येटरे, ई.सी. कापसे, एस.एल. पांडे, एस.बी. भेलावे, डी.डी. कटरे, एस.बी. कटरे, वाय.सी. नागपुरे, एम.आर. येटरे, ए.बी. मेश्राम, बी.एम. र हांगडाले, डी.डी. कोकोडे, मिलिंद मेश्राम, सुनील रहांगडाले आदी वन विभागाच्या कार्यालयसमोर उपस्थित दर्शविली आणि चित्ररथाचे स्वागत केले.
चित्ररथाबद्दल यावेळी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सालेकसा येथे नगर भ्रमण करुन शेवटी हिरवी झेंडी दाखवून आमगावकडे रवाना करण्यात आले.

Web Title: Guardian Minister's visit to the forest department picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.