देशाचे रक्षकच निघाले भक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:40 PM2018-10-03T22:40:49+5:302018-10-03T22:41:40+5:30
केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते. पण सध्या देशात लुटालूट सुरु आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जिवनावश्यक वस्तुंचे दर सातत्याने वाढत आहेत. विद्यमान सरकारच्या धोरणांनी जनता त्रस्त झाली असून अशा खोटारड्या सरकारला जनतेनेच धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला.
या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.डी. किरसान, माजी आ. रामरतन राऊत, उषा हर्षे, माजी तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, शंभुप्रसाद शुक्ला, रामसिंग चव्हाण, सरपंच उषा भांडारकर, इसुलाल भालेकर, संदीप भाटीया, यादवलाल बनोठे, विजय टेकाम, सालेकसाचे अध्यक्ष वासुदेव चुटे, बाबू मेंढे, देवचंद ढेकवार, संजय डोये, राधेलाल रहांगडाले, प्रमिला उपराडे,माजी सरपंच जमिल खान, युवा अध्यक्ष शंकर रहांगडाले, गणेश हुकरे,अजय खेतान, रामकिसन शिवणकर,अरुणा बहेकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली.
अग्रवाल म्हणाले, देशात सर्वसामान्य माणूस दु:खी असून जनतेला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून सामान्य जनतेला जागृत करण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले.
कोरोटे म्हणाले आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे हाल गंभीर असून गावातील रस्ते खड्डेमय झाले आहे. परिणामी अपघातात वाढ झाली असून त्यात अनेकांचा नाहक बळी जात आहे. तर शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.
कार्यक्रमाचे संचालन जगदीश चुटे यांनी केले तर आभार इसुलाल भालेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केवलचंद शेंडे, दीपक शर्मा, दिगंबर कोरे, महेश उके, उज्वल ठाकूर, श्रावण शिवणकर, प्रकाश फुंडे, गुणवंत पटले, किरण चुटे, शहवी खान, निलकंठ वाढई, रमेश चुटे, बुधराम विठ्ठले, नंदलाल पाथोडे, राजकुमार चव्हाण, मनिषा शिवणकर, धनवंता शिवणकर, भागवत रहिले, सुबोध शहारे, रामेश्वर चौधरी, गितेश्वरी शिवणकर, पारबता कटरे, आनंद शेंडे, नरेश बोपचे यांनी सहकार्य केले.