गोंदिया जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:14 PM2018-03-16T13:14:08+5:302018-03-16T13:25:12+5:30

सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

'Gudi Padawa 2018-Grow School Access' in Gondia District | गोंदिया जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम

गोंदिया जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळेत समविचार शिक्षण विभागाचा उपक्रम

हितेश रहांगडाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ पासून गोंदिया जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाचे फलीत झाले. गुढीपाडवा या एकाच दिवशी जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतले होते. या उपक्रमाला मिळत असलेला व्यापक प्रतिसाद पाहता तो यंदा देखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शिक्षण विभाग यासाठी कामाला लागला आहे. अधिकाधिक विद्यार्थी शाळेत दाखल व्हावेत याकरिता जिल्ह्यातील शाळा सक्रियपणे कामाला लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या १०६९ शाळांसह जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या २२ शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार गोंदिया व तिरोडा नगर परिषद शाळातही सदर उपक्रम राबवून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सदर उपक्रम सुरु झाल्यापासून जि.प. शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थी पटसंख्या वाढतच आहेत. उपक्रम सुरु होण्यापुर्वी जिल्ह्यात इयत्ता पहिलीतील प्रवेशिका विद्यार्थी संख्या सत्र २०१४-१५ मध्ये सुमारे ३७००, त्यानंतर उपक्रमाचे फलीत मिळून २०१५-१६ मध्ये १०,१२० विद्यार्थी, २०१६-१७ मध्ये ११९५२ विद्यार्थी तर २०१७-१८ या सत्रात सुमारे १३००० विद्यार्थ्यांनी जि.प. शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेला आहे. गुढीपाडवा उपक्रम राबविण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना सजविलेल्या गाडीवर वाजत-गाजत मिरवणूक, लेझीम भजन दिंडीद्वारे शाळेत आणण्यात येणार आहे. उपक्रम अधिक यशस्वी व परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या कल्पकतेने भर घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याप्रसंगी प्रदीर्घ कार्यक्रम, भाषणे, कंटाळणाऱ्या बाबी टाळून उपकम मनोरंजक बनविण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

पालकांचा करणार सत्कार
विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या यशोगाथा सांगून पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेत सकाळी शिक्षणाची गुढी उभारुन त्याचे महत्व जनसामान्यांना पटवून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सदर उपक्रम यशस्वी राबवून १०० टक्के पटनोंदणी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा सन्मान शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.

डीआयईसीपीडीची चमू दिमतीला
गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळात विद्यार्थी प्रवेश वाढविण्यासाठी गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा यासारखे यशस्वी उपक्रम सुरु असताना गोंदिया जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआईसीपीडी) गोंदियातर्फे शैक्षणिक सत्र २०१८-१९ करीता सर्व दाखल पात्र मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दाखलापात्र मुलांनी माहिती मागून दाखल करण्यात येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष सोडविण्यासाठी संस्थेची चमू प्रत्यक्षात मदतीला येणार आहे.

अभिनव उपक्रमाचे कौतुक
गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाची प्रेरणा देणारे गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सलग तीन वर्षापासून सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.तसेच अशाच अभिनव उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळांतर्फे पुष्पगुच्छ, भेटवस्तू, पुस्तके, गणवेश, गोड पदार्थ इत्यादीद्वारे नवागतांचे स्वागत केले जाणार आहे.
- उल्हास नरड
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.गोंदिया

Web Title: 'Gudi Padawa 2018-Grow School Access' in Gondia District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.