मोहाडी येथे ओबीसी आरक्षण व २०२१ ची जनगणना या विषयावर मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:57+5:302021-08-15T04:29:57+5:30

अध्यक्षस्थानी तालुका ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष आर. आर. अगडे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून तालुका संयोजक हरिराम येळणे, ...

Guidance camp on OBC reservation and 2021 census at Mohadi | मोहाडी येथे ओबीसी आरक्षण व २०२१ ची जनगणना या विषयावर मार्गदर्शन शिबिर

मोहाडी येथे ओबीसी आरक्षण व २०२१ ची जनगणना या विषयावर मार्गदर्शन शिबिर

Next

अध्यक्षस्थानी तालुका ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष आर. आर. अगडे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून तालुका संयोजक हरिराम येळणे, कोषाध्यक्ष साकुरे, महासचिव भुमेश्वर ठाकरे, उपाध्यक्ष जागेश्वर पटले, ग्रामपंचायत माजी सरंपच व तालुका संघटक नरेंद्र चौरागडे, माजी सरंपच धुर्वराज पटले उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी, जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहणार व येणारी २०२१ ची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी. यामध्ये ओबीसींचा काॅलम असायला पाहिजे अन्यथा ओबीसी समाज हा येणाऱ्या जनगणनेवर बहिष्कार टाकेल व ओबीसीला आरक्षण मिळायलाच पाहिजे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान, मोहाडी गावची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते ओबीसी सेवा संघ मोहाडी शाखाध्यक्ष पदी वाय.एफ.पटले, सचिव नरेंद्र चौरागडे, सहसचिव तेजराम चाचेरे, उपाध्यक्ष प्रेमानंद तिरेले, योगराज भोयर, कार्याध्यक्ष राधेश्याम पारधी, सहकार्याध्यक्ष लखनलाल भोयर, कोषाध्यक्ष हिवराज धपाडे, प्रसिद्धी प्रमुख कमलेश पारधी, संयोजक जीवनलाल बघेले, सहसंयोजक उमेश खेमराज बोपचे, संघटक राहुल पटले, योगेश बघेले, नितेश बघेले, मार्गदर्शक श्रीराम पारधी, धुर्वराज पटले, जे. जे. पटले, सुखराम पटले, सदस्य हेमराज भोयर, छगनलाल धपाडे, हेमराज धपाडे, बबलू पटले यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक मांडून संचालन वाय. एफ. पटले यांनी केले. आभार धुर्वराज पटले यांनी मानले. सभेला गावातील सुमारे २०० ते २५० ओबीसी बांधव उपस्थित होते.

Web Title: Guidance camp on OBC reservation and 2021 census at Mohadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.