कौशल्य विकासावर मार्गदर्शन शिबिर
By Admin | Published: October 9, 2015 02:16 AM2015-10-09T02:16:39+5:302015-10-09T02:16:39+5:30
प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत बालाजी इन्स्टीट्यूट आॅफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे आईसेक्ट संस्थेतर्फे कौशल्य विकास अभियान राबविण्यात आले.
कालीमाटी : प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत बालाजी इन्स्टीट्यूट आॅफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे आईसेक्ट संस्थेतर्फे कौशल्य विकास अभियान राबविण्यात आले.
अध्यक्षस्थानी बापू युवा संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष अॅड. योगेश अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो अध्यक्ष संजय कुलकर्णी, बापू युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष असीम शेख, बालाजी इन्स्टीट्युट आॅफ इंफॉर्मेशन टेक्नॉलोजीचे संचालक तिरुपती राव, तज्ज्ञ मार्गदर्शक निरज नागर, कार्यक्रम समन्वयक शैलेश ढाले, झनक बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्तावीक राव यांनी मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे फायदे पीएमकेव्हीवाय, एनएसडीसी तर्फे डिजिटल साक्षरता आणि बँकिंग आधार स्कूल कंटेट, आईसेक्स नॉलेज आॅलिम्पियार्डची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगारभिमुख पाठ्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करता येईल, अशी माहिती नागर यांनी दिली. आईसेक्ट संस्थेतर्फे समाज उपयुक्त व तरुणांसाठी कौशल्य विकास यात्रा लाभदायक ठरणार तसेच कम्प्युटर आइटी हार्डवेअर, नेटवर्किंग, प्रशिक्षण कार्यक्रम, इलेक्ट्रॉनिक्स, बॅकिंग व फायनेंशियल सर्विसेस, टीचर आणि एस्सोर प्रशिक्षण, टेक्सटाइल, कृषी तत्सम स्किल व इतर महत्वाच्या रोजगार निर्मिती पाठ्यक्रमाविषयी माहिती बिसेन यांनी दिली.
यावेळी रॅली काढण्यात आली. संचालन जी. बालकृष्ण यांनी केले. आभार विक्रांत मजूमदार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सौरभ चौरसिया, मनोज उके, उमेश झंगरे, विनोद तान, संदिप साठे, निर्णय गणविर, निखिल भक्तवर्ती, तरुण अग्रवाल आईसेक्ट संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.