रॅगिंग व सायबर क्राईमवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:02 PM2018-10-07T22:02:48+5:302018-10-07T22:03:32+5:30
येथील भवभूती महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समिती, तालुका विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय क. स्तर आणि वकील संघाच्यावतीने गुरूवारी (दि.४) कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील भवभूती महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समिती, तालुका विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय क. स्तर आणि वकील संघाच्यावतीने गुरूवारी (दि.४) कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.भुस्कुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश अमोल देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश एस.एम.एच.शाहीद, सह दिवाणी न्यायाधीश ललित व्ही. श्रीखंडे, अॅड.यु.बी.नागपुरे, एस.डी.बागडे, जी.एस.साखरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश शाहीद यांनी, महाविद्यालयात रॅगिंग होऊ नये कारण ते कायद्याने गुन्हा आहे असे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात सांगितले. श्रीखंडे यानी, मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे सायबर क्राईम केल्यास त्यावर भारतीय कायद्यानुसार दंड होतो असे सांगितले.
प्राचार्य डॉ. भुस्कुटे यांनी, रॅगींग व सायबर क्राईम हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचा गुन्हा करु नये, तसेच सर्वानी याबाबतीत सजग रहावे असे आवाहन केले.
संचालन प्रा.एम.जी.बावनथडे तसेच यु.बी.नागपुरे यांनी केले. आभार एस.डी.बागडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी अॅड. जी. एस. साखरे, एम. जी. बावनथडे, विजय फुंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.