अंधश्रध्दा निर्मूलनावर मार्गदर्शन

By admin | Published: October 16, 2016 12:29 AM2016-10-16T00:29:51+5:302016-10-16T00:29:51+5:30

छोटा गोंदियाच्या शारदा चौकात माँ शारदादेवी मंदिर समिती व समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण

Guide to the superstition | अंधश्रध्दा निर्मूलनावर मार्गदर्शन

अंधश्रध्दा निर्मूलनावर मार्गदर्शन

Next

५०० नागरिकांची उपस्थिती : व्यसनमुक्तीवरही मार्गदर्शन
गोंदिया : छोटा गोंदियाच्या शारदा चौकात माँ शारदादेवी मंदिर समिती व समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शेतकरी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मूलन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ५०० नागरिक उपस्थित होते.
जादूटोणा, बुवाबाजी, भूतबाधा, करणी, भानामती, समाजात प्रचलीत असलेल्या अनिष्ट चालीरीती, परंपरा व अंधश्रध्दा यावर प्रा. प्रकाश धोटे यांनी माहिती दिली. हात चलाखीचे विविध प्रयोग दाखवून ढोंगी बाबा, मांत्रीक यांच्याकडून नागरिकांची कशी फसवणूक होते याची माहिती दिली. आस्था व श्रध्देच्या नावाखाली सामान्य नागरिकांचे मानसिक, आर्थिक व शारीरीक नुकसान केले जाते. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून अंधश्रध्देला थारा देऊ नका, असे आवाहन करण्यात आले. सोबतच सापाच्या विविध जातीची माहिती देण्यात आली. सर्पदंश झाल्यास वैद्यकीय उपचार घ्या, बुवाबाजी करणाऱ्याकडे जाऊ नका, असे आवाहन करण्यात आले. समाज व्यसनमुक्त व अंधश्रध्दा मुक्त करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी तिर्थराज उके, रमेश बागडे, राकेश पहिरे, रमेश सोनवाने, बिसाऊ मात्रे, मनोज सोनवाने, रमेश सोनुले उपस्थित होते. प्रस्तावना शारदा देवी मंदिर समितीचे अध्यक्ष आशीष उईके यांनी केले.
आभार डिंपल उके यांनी केले. यशस्वीतेसाठी भरत कोरे, राजकुमार पाथोडे, तेजलाल उके, प्रफुल उके, नामदेव शेंडे, डालेश्वर उके, प्रमोद वासनिक, लल्ला सिंहमारे, प्रेम नेवारे, राहुल गौतम, अमोल मुटकुरे, सागर वाकडे, गोविंदा वाखले, आशिष बागडे, दादा बर्डे, लोकेश शेंडे, जयवंता उके, पुष्पा शहारे, संगीता सोनवाने, अनिता शेंडे, कोरे, सिंहमारे, गीता नागरीकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Guide to the superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.