पालकमंत्र्यांनी दिले नुकसानभरपाईचे निर्देश

By admin | Published: May 24, 2016 01:54 AM2016-05-24T01:54:28+5:302016-05-24T01:54:28+5:30

गोंदिया व आमगाव तालुक्यात २१ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने मोठे नुकसान आहे.

Guidelines for compensation offered by Guardian Minister | पालकमंत्र्यांनी दिले नुकसानभरपाईचे निर्देश

पालकमंत्र्यांनी दिले नुकसानभरपाईचे निर्देश

Next

गोंदिया : गोंदिया व आमगाव तालुक्यात २१ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने मोठे नुकसान आहे. यात अनेकांच्या घरांची पडझड होऊन मोठी वित्तहानी झाली आहे. पिकांचेही मोठे नुकसान झाले असून यात प्राणहाणीसुद्धा झाली. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन पिडितांना नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना दिले.
अनेकांचे घर पडल्याने व छत उडाल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात यावी, असे निर्देश देत याचा अहवाल त्वरित शासनाला पाठविण्याबाबत पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.सूर्यवंशी यांनी नुकसानीचे पंचनामे केले जात असून प्रशासन नियमानुसार सर्व प्रकारची मदत करीत असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Guidelines for compensation offered by Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.