विद्यार्थ्यांच्या जीवनाला खरा आकार देण्याचे काम गुरुच करतो (शिक्षक)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:59+5:302021-09-06T04:32:59+5:30

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी डॉ. राधाकृष्णन ...

Guru is the one who gives true shape to the life of the students (Teacher) | विद्यार्थ्यांच्या जीवनाला खरा आकार देण्याचे काम गुरुच करतो (शिक्षक)

विद्यार्थ्यांच्या जीवनाला खरा आकार देण्याचे काम गुरुच करतो (शिक्षक)

Next

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी डॉ. राधाकृष्णन हे एक थोर शिक्षण तज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, कुशल वक्ते, राजकारण, समाजकारण व धर्मकारण याचे समन्वयक तसेच भारताची प्रतिमा देश विदेशात उंचावणारे महान तत्त्वचिंतक होते. त्यांना शिक्षण व शिक्षकांविषयी प्रचंड आदर व प्रेम होता. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो, असे सांगितले. कार्यक्रमाला शिक्षक ए. एस. बोरकर, जे. एस. मोटघरे, ए. आर. कापगते, एल. बी. रहांगडाले, प्रा. डॉ. एम. एस. मेंढे, डी. एम. तुरकर, नमिता मांडारकर, तेजस्विनी चूटे, एम. जी. कोहळे, एल. एल. पातोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Guru is the one who gives true shape to the life of the students (Teacher)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.