हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:31 PM2019-05-13T22:31:02+5:302019-05-13T22:31:31+5:30

येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

Halbeetola, Shrirampur flooded | हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

हलबीटोला, श्रीरामपूर येथे पाणी पेटले

Next
ठळक मुद्देविहिरी आटल्या : आता पोहोचतो नगर पंचायतचा टँकर, नळ योजनेचा अभाव, दरवर्षी पाणी टंचाईच्या संकटाने गावकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील नगरपंचायतीच्या हलबीटोला व श्रीरामपूर वार्डात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खासगी सार्वजनिक बोरवेल व विहीरींनी तळ गाठल्यामुळे नगर पंचायत गोरेगावने या भागात चार टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.
गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या हलबीटोला प्रभाग क्रं. ५ व श्रीरामपूर प्रभाग क्रं. १ मधील विहीरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतीने पाणी पुरवठा करण्यासाठी चार टँकर लावले त्यामुळे पाणी प्रश्नावर काही प्रमाणात तोडगा निघाला आहे. दररोज सकाळी या दोन वार्डात पाणी पुरवठा केला जातो. एका टँकरमागे नगरपंचायत प्रशासनाला एक हजार ते पंधराशे रुपये खर्च येत आहे.
श्रीरामपूर येथील ७० कुटूंब व हलबीटोला येथील १०० कुटूंबांना दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नगर पंचायतने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध प्रयोग केले असले तरी हलबीटोला, श्रीरामपूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी न.प.ला टँकरचा आसरा घ्यावा लागत आहे.

शेतातील बोअरवेलमुळे पाणीटंचाई
गोरेगाव शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर शेती आहे. या शेतात २०० ते ३०० फुटापर्यंत बोअरवेल खोदलेले आहे. त्यामुळे खरीप व रब्बी पिक घेणाºया शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. परिसरातील बोअरवेलमुळे १०० ते १५० फुटाच्या बोअरवेलचे पाण्याचे साठे कमी झाले तर विहीरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. शेतातील बोअरवेलमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
पाणी पुरवठा योजना नाही
हलबीटोला व श्रीरामपूर येथे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे येथील नागरिकांना विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे परिसरातील तळे व इतर पाणीसाठे वाळत असल्यामुळे या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
शंभर लिटर पाणी
येथील दोन्ही वॉर्डात टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास १७० कुटूंब टॅकरच्या पाण्यावर अवलंबून असून न.प.द्वारे एका कुटूंबाला १०० ते १५० लिटर पाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन दोन्ही वॉर्डात नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढून पाणी टंचाई दूर केली जाईल.
- आशीष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव.

वॉर्ड क्रं. ५ व वॉर्ड क्रं. १ मध्ये एकूण चार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. एवढ्यावरच नागरिकांचे भागत नसून पुन्हा चार टँकरची गरज आहे. त्याकडे नगर पंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.
- रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक श्रीरामपूर.

Web Title: Halbeetola, Shrirampur flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.