लॉकडाऊनमुळे मजुरांच्या रोजगारावर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:51+5:302021-04-27T04:29:51+5:30

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक कामासाठी सकाळची वेळ ...

The hammer on the employment of laborers due to lockdown | लॉकडाऊनमुळे मजुरांच्या रोजगारावर गदा

लॉकडाऊनमुळे मजुरांच्या रोजगारावर गदा

Next

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक कामासाठी सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणाऱ्या मजुरांची परिस्थिती बिकट आहे. त्यातच आता आणखी काही दिवसांसाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

मजुरांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे, तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. लघू व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्यांसमोर दररोज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती अशी अवस्था झाली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ‘ब्रेक द चेन’मुळे ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही वेळ निश्चित करून दिली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजूर वर्गाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन वाढविल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे.

......

मजुरांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज

मजूर वर्गासाठी सरकारने पावले उचलून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. एकीकडे शासन गरीब मजुरांना अल्पदरात धान्य वाटप करण्याच्या, तसेच मोफत जेवण देण्याच्या वल्गना करीत आहे. ही केवळ आश्वासनेच असून, प्रत्यक्ष मजुरांच्या झोळीत काहीच पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्वसामान्य व गरीब लोकांचा प्राधान्याने विचार करणार, रोजीरोटी कायम ठेवण्यात येईल, असे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र, मजुरांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न आहे.

......

Web Title: The hammer on the employment of laborers due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.