मुर्तिकारांचे हात कामाला लागले

By admin | Published: June 16, 2017 01:07 AM2017-06-16T01:07:40+5:302017-06-16T01:07:40+5:30

येत्या १४ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे.

The hands of the custodians started to work | मुर्तिकारांचे हात कामाला लागले

मुर्तिकारांचे हात कामाला लागले

Next

गोंदियातली चितारओळ गजबजली : मूर्त्या येताहेत आकाराला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या १४ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मूर्तिकार आपले बस्तान मांडत असल्याने पुन्हा एकदा गोंदियातली चितारओळ गजबजून गेली आहे. मूर्तिकारांनी आतापासूनच मूर्त्या बनविण्यास सुरूवात केल्याचेही दिसून येत आहे.
कुंभारांचा परिसर व मूर्त्यांसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मुर्त्यांची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत आहे. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तिकार येत असून यंदाही मूर्र्तिकारांचे परिवार येथे आले आहेत. हनुमान चौकापासून या मुर्तीकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मुर्त्या तयार करतात.
हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मुर्तीपूजेला तेवढाच मान आहे. यंदा १४ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी असून मुर्तीपूजनाचे सण सुरू होत आहेत. २५ आॅगस्ट रोजी गणपती स्थापना येत असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाबाई, लक्ष्मीपूजन सारखे सण येतील. त्यामुळे हे मुर्तीकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मुर्त्या बनविण्यास सुरूवात केली असल्याचेही दिसत आहे. मोठ्या संख्येत मूर्तिकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते इंगळे चौक हा परिसर जणू ‘चितारओळ’ म्हणूनच प्रसिद्ध झाला आहे.
शिवाय इंगळे चौक पुढील परिसरातही काही मुर्तीकार येत असून व्यवसाय करतात. आता सध्या तरी एक-दोनच परिवारांचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्य मुर्तीकारांनी ते नेहमी राहत असलेल्या जागांच्या मालकांची भेट घेतली असून लवकरच ते राहण्यासाठी येतील. आपल्या घरात मूर्तिकारांच्या हातून साक्षात देवच घडत असल्याने घरमालकही खुशी-खुशी मूर्र्तिकारांना आपले घर किंवा जागा देतात.

छत्तीसगड मधील मूर्तिकारांचेही आगमन
येथील सिव्हील लाईन्स परिसरात लगतच्या गावांतील मुर्तीकार येत असून आपला व्यवसाय करून निघून जातात. मागील काही वर्षांपासून मात्र त्यांच्यासोबतच लगतच्या छत्तीसगड राज्यातीलही काही मुर्तीकार गोंदियात येवू लागले आहे. तसेच बंगाली मुर्तीकार सुद्धा येतात. त्यामुळे गोंदियाचा सिव्हील लाईन्स परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे.
कान्होबा व गणपतीच्या मूर्त्यांची सुरूवात
मूर्तिपूजनाच्या सणांत सर्वप्रथम जन्माष्टमी येते व त्यानंतरच अन्य सण येतात. येत्या १४ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी येत असल्याने मूर्तिकारांनी आतापासूनच कान्होबाच्या मूर्त्या तयार करण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येकच मूर्तिकाराच्या मंडपात कान्होबाच्या मूर्त्या तयार होताना दिसत आहेत. तर काही मूर्तिकार गणपतीच्या मूर्त्यांपासून सुरूवात करीत असल्याने त्यांनी गणपतीच्या मूर्त्यांची तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे.

Web Title: The hands of the custodians started to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.