माहेरून ८ लाख व दागिने आण म्हणत विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:52 PM2024-09-26T14:52:24+5:302024-09-26T14:54:25+5:30

तालुक्यातील कामठा येथील प्रकरण : क्षुल्लक कारणावरून पतीला घरची मंडळी होती भडकवीत

Harassment of married woman by demanding 8 lakhs and jewels from outside, crime against five persons | माहेरून ८ लाख व दागिने आण म्हणत विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा

Harassment of married woman by demanding 8 lakhs and jewels from outside, crime against five persons

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
माहेरून ८ लाख रुपये व सोन्याचे दागिने आण म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


कामठा येथील दीपलता मनीष लिल्हारे (३४) यांनी रावणवाडी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. तेव्हापासून त्या कामठा येथे पतीच्या घरी राहत होत्या. तिचा पती दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने तो १२ मार्च २०२३ पासून दीपलता हिच्याशी भांडण व शिवीगाळ करून मारहाण करायचा. 


मनीष लिल्हारे हा दारूपाणी पिऊन दीपलताला माहेरून ८ लाख रुपये व सोन्याचे झुमके तुझ्या माहेरून घेऊन ये म्हणून तसेच घरगुती क्षुल्लक कारणावरून भांडण, मारपीट करून मानसिक त्रास व धमकी देत होता. सासू देवकी सुरेश लिल्हारे, भासरे कैलाश सुरेश लिल्हारे, विलास सुरेश लिल्हारे, जाऊ हेमलता कैलाश लिल्हारे, कविता विलास लिल्हारे हे सर्व माहेरून सोन्याचे झुमके व ८ लाख रुपये घेऊन ये म्हणून त्यांना त्रास देत होते. हे प्रकरण भरोसा सेलकडे गेल्यावरही तडजोड झाली नाही. परिणामी तक्रारीवरून २३ सप्टेंबर रोजी आरोपींवर भादंविच्या कलम ३२३, ३४, ४९८ (अ), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.


पहिल्या पत्नीपासून दोन बालके असल्याची माहिती लपविली 
आरोपी मनीष लिल्हारे याला पहिल्या पत्नीपासून दोन मूलबाळ आहेत ही माहिती लपविली होती. पती व त्यांच्या घरच्या लोकांच्या त्रासामुळे २७ जून २०२४ दीपलता माहेरी रतनारा येथे आली.


लग्नानंतर दोन वर्षे चांगली वागणूक 
लग्नानंतर पती मनीष लिल्हारे हा दोन वर्षापर्यंत चांगला राहिला. त्यानंतर दारूपाणी पिऊन भांडण व मारपीट करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. आरोपी पतीला त्याचे घरचे लोक सासू देवकी, भासरा कैलाश, भासरे विलास, जाऊ हेमलता, लहान जाऊ कविता हे सहकार्य करीत असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.

Web Title: Harassment of married woman by demanding 8 lakhs and jewels from outside, crime against five persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.