सोशल मीडियावरही महिलांचा छळ; तक्रार करण्यास महिलांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:50+5:302021-07-23T04:18:50+5:30

गोंदिया : सद्यस्थितीत तरुण-तरुणींमध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होऊ लागला. सोशल मीडियावर धूम ठोकणाऱ्या तरुणी, महिलांचा छळ होत आहे. ...

Harassment of women on social media as well; Women refuse to complain | सोशल मीडियावरही महिलांचा छळ; तक्रार करण्यास महिलांचा नकार

सोशल मीडियावरही महिलांचा छळ; तक्रार करण्यास महिलांचा नकार

Next

गोंदिया : सद्यस्थितीत तरुण-तरुणींमध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होऊ लागला. सोशल मीडियावर धूम ठोकणाऱ्या तरुणी, महिलांचा छळ होत आहे. सोशल मीडियावर महिलांची बदनामी करून त्यांचे फोटो वायरल करण्याचा सपाटा आजघडीला जिल्ह्यासह सगळीकडे सुरू आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून महिलांची बदनामी व छळ केला जात आहे. परंतु अधिक आपली बदनामी होऊ नये म्हणून तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. काही तरुण लग्नाचे आमिष देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. आपल्या जाळ्यात अडकविल्यानंतर त्यांचा ‘यूज ॲण्ड थ्रो’ केला जात आहे.

....................

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक

-महिला व तरुणींचा छळ सोशल मीडियावरून झाला तरी आणखी आपल्याला बदनामी नको, म्हणून सोशल मीडियावर झालेला छळही मुकाट्याने सहन करतात.

-सोशल मीडियाचा वापरच का करते असा टोमणा घरातील मंडळी व नातेवाईक आपल्यालाच मारून नावे ठेवतील या भीतीने तक्रार करण्यात महिला पुढे येत नाही.

..........................

येथे करा तक्रार

१) सोशल मीडियावरून महिला किंवा मुलींचा छळ झाला तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

२) पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केल्यास महिलांना न्याय मिळेल.

३) महिला सेल किंवा सायबर सेलकडेही तक्रार केल्यास त्याचा निर्वाळा होईल.

.......................

कोट

सगळीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींसाेबत जवळीक साधतात. अनोळखी व्यक्तीसोबत वारंवार होत असलेल्या संवादातून जवळीक निर्माण होते. यातून प्रेमाच्या भूलथापात मुली पडतात. यात मुलींचे नुकसान होेते. त्यासाठी मुलींना सोशल मीडियावर स्वत:ला सांभाळणे आवश्यक आहे.

-ममता पाऊलझगडे, महिला कार्यकर्ता

...............

कोट

सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली दोस्ती एकदम घट्ट करून त्यातून आपला सुखी संसार थाटण्याचा बालीशपणा करणाऱ्या तरुणींना बदनामीला सामोरे जावे लागते. यातून त्यांची सामाजिक हानी होते. गरज तेवढाच सोशल मीडियाचा वापर करावा. अनोळखी व्यक्तींना प्रतिसाद देऊन नये.

- छाया शंकर नागपुरे, महिला कार्यकर्ता.

........................

फेसबुक, व्हाॅट्‌सॲप अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले मुलींशी जवळीक साधून मुलींची फसवणूक करण्याचे अनेक प्रकरण समोर येतात. हे घडू नये यासाठी मुलींनी सोशल मीडियाचा वापर सांभाळूनच करावा. जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. आपल्या आई-वडिलांची इज्जत मुलामुलींनी राखावी.

- तेजस्विनी कदम, पोलीस निरीक्षक (सायबर सेल)

.....................

अशा प्रकारचा होतो छळ

- महिलांना अश्लील फोटो पाठविणे

- चॅटिंग करताना अश्लील शब्दात बोलणे

- चर्चेतून काही न पटल्यास अभद्र बोलणे

- प्रसंगी शिवीगाळही केली जाते.

- तरुणी किंवा महिलांच्या संपर्कात आल्यावर त्यांना ब्लॅकमेल करणे

- महिलांना बदनामी करण्याची धमकी देणे

...................

सोशल मीडियावरून झालेल्या तक्रारी

सन----एकूण तक्रारी------ महिलांच्या तक्रारी

२०१९----०८--------------------०३

२०२०----०९---------------------०२

२०२१-----०४--------------------०२

Web Title: Harassment of women on social media as well; Women refuse to complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.