हार्वेस्टरमुळे लोप पावली बैलबंडीची मळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:07+5:302021-05-25T04:33:07+5:30

गोंदिया : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात, शेतातील खऱ्यावरच केला जाणारा स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही ...

Harvester eliminates bullfighting | हार्वेस्टरमुळे लोप पावली बैलबंडीची मळणी

हार्वेस्टरमुळे लोप पावली बैलबंडीची मळणी

Next

गोंदिया : धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात, शेतातील खऱ्यावरच केला जाणारा स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजेपुढे धान मळणीच्या कामातून येणारा त्राण कमी होत होता. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्राने घेतली आहे. त्यामुळे धान मळणीची पूर्वीची मजा आता संपली आहे. आधुनिक युगात नांगरणी व वखरणी बैलाऐवजी ट्रॅक्टरने होत असल्याने शेतीत यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

२१ व्या शतकात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. रोजच्या संशोधन तंत्राच्या बळावर तयार होत असलेल्या यंत्राने मानवी जीवनाच्या परिघातील प्रत्येक बिंदूला स्पर्श केला आहे. जे काम फक्त मानवच करू शकतो, असा दृढ समज मानवाचा होता; मात्र हा समज यंत्रानी खोटा ठरविला आहे. कृषीप्रधान भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धानाची मळणी करण्यासाठी एक दशकापूर्वी बैल किंवा बैलबंडी हेच एकमेव मळणी यंत्र होते. पुढे ट्रॅक्टरवर चालणारे मळणी यंत्र आले. आता तर त्याच्याही पुढचे तंत्रज्ञान म्हणजे हार्वेस्टरचा वापर सुरू झाला आहे.

हार्वेस्टरच्या वापरामुळे धानाची कापणी, बांधणी व मळणीचा खर्च वाचतो. त्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरचा वापर करीत आहेत. विशेष करून उन्हाळी धान पिकासाठी हार्वेस्टरचा वापर शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्रात यंत्र आल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतीची अवघड कामे आता सोपी झाली आहेत. त्यामुळे यंत्राचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून येते.

Web Title: Harvester eliminates bullfighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.